शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात बाजार समित्या प्रभावित

By admin | Updated: November 17, 2014 01:41 IST

प्रशासकाला मूळ कामे सांभाळून द्यावी लागणार सेवा.

विवेक चांदूरकर/अकोला

            ऐन हंगामाच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आल्या असून, शासकीय प्रशासक बसविण्यात आला आहे. मात्र, या प्रशासकांकडे सहाय्यक निबंधक पदाचीही जबाबदारी राहणार असल्याने बाजार समितीतील कामे प्रभावित होणार आहेत. शेतकरी शेतमाल तारण ठेवतात. पैशांचा व्यवहाराच्या वेळी प्रशासकांची उपस्थिती नसली तर त्यामध्ये खोळंबा येऊ शकतो. तसेच शेतकर्‍यांना, हमाल, कामगारांना अडचणी आल्या तर कुणाकडे मांडाव्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्या सरकारने राज्यातील २00 बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. मात्र, नवीन निवडणुकीची घोषणा केलेली नाही. शासनाने निबंधक कार्यालयात पाठविलेल्या आदेशामध्ये बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त करून निवडणुका घेण्याचे म्हटले आहे. त्यानुसार अकोला, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर या चार बाजार समित्यांवर प्रशासकांची नव्याने नेमणूक करण्यात आली. अकोला बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे पातूरचे सहायक तालुका निबंधक ए.डी. डोंगरे यांच्याकडे सोपविली आहेत. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर डी. आर. पिंजरकर, बाश्रीटाकळी बाजार समितीच्या प्रशासकपदी ओ. एस. साळुंखे, तर पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे आर. आर. विटणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. अकोला बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा शेतमाल तारण ठेवण्यात येतो. शेतकर्‍यांना भाड्याने वाहने करून शेतमाल तारण ठेवायला आणावा लागतो. अशावेळी प्रशासक नसल्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशी बोलाविले तर अकारण जास्तीचा भुर्दंड पडू शकतो. सध्या बाजार समितीत सोयाबीनसोबतच, तूर, ज्वारी मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. दररोज हजारो क्विंटल शेतमाल येत असल्यामुळे बाजार समितीत गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव मिळाला, व्यापार्‍यांनी फसवणूक केली तर सभापती किंवा प्रशासकाकडे शेतकरी दाद मागतो. मात्र, प्रशासक नसला तर शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागतो.