शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:44 PM

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला.

ठळक मुद्दे पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित त्यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा होण्याअगोदरच त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा मुर्हूतही जाहीर केला. हा ‘ओवेसी’ प्रयोग पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही मतदारसंघांत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.

-  राजेश शेगोकार

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणातअकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित त्यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा होण्याअगोदरच त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा मुहूर्तही जाहीर केला. आंबेडकरांच्या हा आणखी एक राजकीय प्रयोग आहे. या ‘ओवेसी’ प्रयोगाचा पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही मतदारसंघांत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी ९० च्या दशकात ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा यशस्वी प्रयोग अकोल्यात केला. अकोला पॅटर्न नावाने ओळखल्या जाणाºया या प्रयोगाचे राजकीय नाव म्हणजे ‘भारिप बहुजन महासंघ’. १९९० ते २००४ पर्यंत या प्रयोगाने सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडे दोन ‘हुकुमी एक्के’ होते. यातील एक म्हणजे आंबेडकर, हे ब्रँडनेम, तर दुसरे म्हणजे स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची बांधलेली मोट. यामुळेच अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना यश अनुभवता आले. स्वत: आंबेडकर हे दोन वेळा खासदार झाले. डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे यांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांना आमदार म्हणून मिरविता आले. अकोल्याची जिल्हा परिषद आजतागायत भारिप-बमसंकडे कायम राहिली. अकोल्याबाहेर नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये भीमराव केराम, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी, असे आमदारही त्यांनी निवडून आणले; मात्र गेल्या काही वर्षांत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला अपयशाचे थोडे डाग लागले आहेत. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या संपूर्ण काळात त्यांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश करात यांच्यासह मेळावेसुद्धा घेतले. दरम्यानच्या काळात कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले. परंपरागत मते अन् ओबीसींची सांगड घालत त्यांनी दोन वर्षांपूर्वी ओबीसींचा जागर सुरू केला. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व हाती घेत निवडणुकीचा बिगुल फुंकला व काँग्रेसला १० जागांचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासंदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका जाहीर होण्यापूर्वीच आता त्यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांनी नवा सारिपाट मांडल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPoliticsराजकारण