शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अकोल्यातील खराब तांदळाचे अमरावतीत वाटप; ‘वखार’च्या अकोला गोदामातील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:05 AM

अकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला.

ठळक मुद्देखराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला. प्रत्यक्षात त्याचे वाटप अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींना होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोल्यात खराब झालेला तांदूळ अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींच्या माथी मारण्यात वखार महामंडळ यशस्वी झाले आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी राज्य शासन भारतीय खाद्य निगमकडून धान्याची खरेदी करते. धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने अकोला एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेत तेथे साठा केला. जिल्हाधिकार्‍यांनी मागणी केल्यानुसार गहू, तांदुळाचा पुरवठा वखारच्या गोदामातून केला जातो. गेल्या दोन वर्षांत भारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या गहू, तांदुळाच्या साठय़ात हजारो क्विंटलची तफावत आली आहे. तसेच उपलब्ध साठय़ापैकी मोठय़ा प्रमाणात धान्य खराब झाले. ते धान्य जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय गोदामांतून लाभार्थींना वाटप करण्याची तयारी राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाने केली; मात्र तांदूळ खराब असल्याने तो घेण्यास अकोला जिल्हा प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे डिसेंबर २0१७ पासून त्या गोदामातून धान्याची उचल बंद केली. त्यातच भारतीय खाद्य निगमने गोदामातील धान्य साठा शून्य करून दोन वर्षांतील धान्याचा हिशेब दिल्याशिवाय वखार महामंडळाच्या गोदामात नव्याने पुरवठा करणेही बंद केले. अडचणीत आलेल्या वखार महामंडळाने भारतीय खाद्य निगमला तांदुळाबाबत निर्णय घेण्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार खाद्य निगमच्या तीन अधिकार्‍यांच्या पथकाने वखारच्या गोदामात १४ डिसेंबर रोजी धडक दिली. खराब झालेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गव्हाची पाहणी पथकाने केली. 

खराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!वखार महामंडळाने खराब झालेल्या २६६२ क्विंटल तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी अकोल्याच्या गोदामातून धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविला. प्रत्यक्षात अमरावती जिल्हय़ाचा विस्तार आणि लाभार्थी संख्या पाहता त्यांना हा तांदूळ मिक्स करून वाटप करण्याचा डाव त्यामागे असल्याची माहिती आहे. 

अकोल्यातील तूट कशी भरून काढणार!खाद्य निगमने अकोला जिल्हय़ासाठी दिलेल्या तांदुळापैकी २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाला. तो धामणगावात हलविण्यात आला. त्यामुळे अकोला जिल्हय़ासाठी पुरवठा केलेल्या तांदुळातील तूट वखार महामंडळ कशी भरून देणार, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. त्याचवेळी धामणगावात प्रतवारी सुधारून तांदूळ आणल्याचाही बनाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यातून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. 

भारतीय खाद्य निगमने अकोल्यातील तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी धामणगावच्या गोदामात हलविण्याचे वखारच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाला सांगितले. त्यानुसार तांदूळ हलविण्यात आला. - शि. र. अडकमोल, नवृत्त विभागीय व्यवस्थापक, वखार महामंडळ, अमरावती.

टॅग्स :Akola cityअकोला शहरMarketबाजार