शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीतील तांदूळ व साखरेचे शिधापत्रिकाधारकांना वाटप करा

By admin | Updated: September 20, 2014 00:59 IST

अकोला जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : ठोस उपाययोजना नाही.

आकोट : तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात महसूल विभागाच्या धाडीत जप्त केलेला १७१ कट्टे तांदूळ व किराणा दुकानात जप्त केलेली १९ कट्टे साखरेची आकोट तालुक्यातील शिधा पत्रिकाधारकांना एपीएलच्या दराने विक्री करून येणारी रक्कम शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी १५ सप्टेंबर २0१४ रोजी दिले. उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना २७ सप्टेंबर २0१३ ला सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वाटप करावयाच्या धान्यसाठय़ाची अवैध वाहतूक करणार्‍या एका ट्रकमध्ये १७१ कट्टे तांदूळ आढळून आला. हा तांदूळ चोहोट्टा बाजार येथील गणेश सुरजमल अग्रवाल यांचा असल्याच्या माहि तीवरून पुरवठा निरीक्षकांनी त्यांच्या किराणा दुकानाची तपासणी केली असता त्यामध्ये १९ कट्टे साखर व २१ कट्टे गहू आढळून आला. या मालाच्या खरेदीच्या पावत्या अग्रवाल सादर करू शकले नाही. त्यामुळे तांदूळ, गहू व साखर हा धान्यसाठा महसूल विभागाने शासन दरबारी जमा केला. या प्रकरणी दहीहांडा पोलिस स्टेशनमध्येसुद्धा गणेश अग्रवाल, ट्रक मालक-चालक सुशील उरे, श्याम राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रेल येथील स्वस्त धान्य दुकानदार मनकर्णाबाई इंगळे यांचे दुकान तपासणीअंती सील करून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या धान्यसाठय़ाविषयी जिल्हाधिकारी शिंदे यांच्याकडे पुरवठा निरीक्षण अधिकार्‍यांनी या प्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत आदेशाची मागणी केली.