अकोल्यातील बीटकॉइनच्या सटोडियांसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 14:14 IST2017-11-18T14:08:38+5:302017-11-18T14:14:34+5:30
अकोला: आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजारातील फसवणुकीला सुरुवात झाली असून, बीटकॉइनवर दररोजची लक्षावधींची उलाढाल करणाºयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.

अकोल्यातील बीटकॉइनच्या सटोडियांसाठी धोक्याची घंटा
- संजय खांडेकर
अकोला: आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजारातील फसवणुकीला सुरुवात झाली असून, बीटकॉइनवर दररोजची लक्षावधींची उलाढाल करणाºयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. नागपुरात ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेत. तसे प्रकार आता अकोल्यात उघड होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने बीटकॉइनचा सट्टाबाजार खेळणाºयांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
युनायटेड स्टेटमध्ये डिजिटल चलन, आभासी मुद्रा म्हणून बीटकॉइन सट्टाबाजार जगभरात ओळखल्या जात आहे. आॅनलाइन सट्टाबाजारातील बीटक्वॉइनमुळे एका कॉइनचे दर अलीकडे पावणेपाच ते सव्वापाच लाखांवर पोहोचले आहे. हे दर काही वर्षांआधी एका लाखांच्या आत होते. त्यामुळे झटपट श्रीमंतीकडे तरुण वर्गाचा जास्त कल आहे. बीटकॉइन खरेदी करताना भारतीय मुद्रा मोजाव्या लागतात; मात्र विक्रीच्या वेळी खरेदीदार किंवा संबंधित ठरावीक जागतिक ब्रॅण्डच्या वस्तूंचीच खरेदी कराव्या लागतात. यामध्ये फसवणुकीचे प्रकार होत असून, नागपूरमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरच्या धर्तीवर अकोल्यातही असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जगभरातून मागणी वाढल्याने बीटकॉइनचे भाव वधारले असून, अनेक देशांची अर्थव्यवस्था त्याभोवती फिरू लागली आहे. या आभासी मुद्रा चलनात चीन आणि इतर देशांनी उडी घेऊन क्राप्टो आणि एलएफसी नावाचे वेब क्वाइन बाजारपेठेत आले आहे. पॅनकार्ड किंवा पासपोर्ट क्रमांकावर ही नोंदणी होत असली, तरी याला भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत बीटकॉइनचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले असून, कोट्यधीश होण्याच्या आमिषाला शेकडो युवक बळी पडत आहे. अकोल्यासारख्या ठिकाणी या दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये शेकडो युवक जोडले गेले असून, बीटकॉइनवर कोट्यवधींची उलाढाल होत आहे. बीटकॉइनच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नागपुरात दाखल झाल्याने आता बीटकॉइनचा सट्टाबाजार खेळणाºयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.