तुमचंही पॅनकार्ड रद्द झालं नाही ना ? तपासून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 12:28 PM2017-08-03T12:28:36+5:302017-08-03T12:48:33+5:30

केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार देशातील नागरिक एकच पॅनकार्ड वापरू बनवू शकतो. मात्र वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, देशात अशा अनेक व्यक्ती आढळून आल्या आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत.

Your PAN card has not been canceled? Check out | तुमचंही पॅनकार्ड रद्द झालं नाही ना ? तपासून पाहा

तुमचंही पॅनकार्ड रद्द झालं नाही ना ? तपासून पाहा

Next


नवी दिल्ली, दि. 3 - केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार देशातील नागरिक एकच पॅनकार्ड वापरू बनवू शकतो. मात्र वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, देशात अशा अनेक व्यक्ती आढळून आल्या आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत. अशा पॅनकार्डची संख्या 11 लाख 44 हजार 211 एवढी असल्याचेही त्यांनी सांगितले. ही सर्व पॅनकार्ड रद्द करण्यात आली आहेत. 


गंगवार यांनी राज्यसभेत लेखी स्वरुपात उत्तर दिले की,  27 जुलैपर्यंत एका व्यक्तीच्या नावे एकाहून अधिक पॅनकार्ड असल्याचे आढळून आले. यांची संख्या 11,44,211 एवढी आहे.  ही सर्व पॅनकार्ड आता रद्द करण्यात आली आहेत. त्यांनी असेही सांगितले की, पॅनकार्ड वाटपाच्या नियमानुसार, एका व्यक्तीला एकावेळी एकच पॅनकार्ड देण्यात येते.  तर दुसरीकडे 27 जुलैपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान  1,566 बनावट पॅन कार्डदेखील आढळून आली आहेत. 
 

कशी तपासणार पॅनकार्डची वैधता ?
पॅनकार्ड रद्द केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना चुकून स्वतःचे पॅनकार्ड रद्द झालेले नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मात्र टेन्शन घेऊ नका. पॅनकार्ड रद्द झाले आहे की नाही? हे अगदी काही वेळेतच तुम्ही ऑनलाइन तपासून पाहू शकता. 

1. आयकर विभागाची वेबसाइट http://incometaxindiaefiling.gov.in/ वर लॉग-इन करा. लॉग-इन केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल. 

 2. आयकर विभागाची साइट सुरू  झाल्यानंतर डाव्या बाजूकडील  Know Your PAN हा पर्याय निवडावा. हा Know Your PAN पर्याय निवडल्यानंतर आणखी एक विंडो ओपन होईल. यात तुम्हाला तुमच्याबाबत सर्व माहिती द्यावी लागेल. 


3. जी माहिती तुमच्या पॅनकार्डवर आहे तिच माहिती ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला द्यावी लागणार. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरावा. उदाहरणार्थ जर आडनाव किंवा मधले नाव नसल्यास तो रकाणा भरण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला मोबाइल नंबर द्यावा लागेल. मोबाइल नंबर दिल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. ही माहिती सबमिटी केल्यानंतर आणखी एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोवर मोबाइलवर आलेला OTP क्रमांक टाकावा आणि क्लिक पर्याय निवडावा.


4. यानंतर ओपन होणा-या पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड रद्द केले आहे की केलेले नाही, याची माहिती उपलब्ध होईल.  


31 ऑगस्टपर्यंत आधार कार्डसोबत जोडा पॅन कार्ड 
सरकारनं करदात्यांना आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे.  31 ऑगस्टपर्यंत पॅन कार्ड जोडले नाही तर ते रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 

 करदात्यांचा वाढता ओघ पाहता प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्ट 2017 ही मुदत असेल.

आर्थिक वर्ष २०१६-१७ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस ३१ जुलै असून ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे एका अधिकाºयाने रविवारी सांगितले होते.  आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकली फाइल झालेले सध्याच दोन कोटी रिटर्न आले आहेत. करदात्याने रिटर्न वेळेतच दाखल करावे, असेही अधिका-याने सांगितलं होते. 

Web Title: Your PAN card has not been canceled? Check out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.