अकोट- अकोला मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:18 IST2021-06-17T11:15:07+5:302021-06-17T11:18:27+5:30

Accident on Akot Road : दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटनाअकोट- अकोला मार्गावरील बळेगाव फाटयानजीक १७ जुन रोजी सकाळी घडली.

On Akot-Akola road, a truck crushed a two-wheeler | अकोट- अकोला मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

अकोट- अकोला मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

ठळक मुद्दे ठार झालेल्या युवकाची ओळख अद्याप पटली नाही. पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

अकोटः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटनाअकोट- अकोला मार्गावरील बळेगाव फाटयानजीक १७ जुन रोजी सकाळी घडली. अपघातात ठार झालेल्या युवकाची ओळख अद्याप पटली नाही.

अकोट ते अकोला मार्गावर बळेगाव फाटयानजीक हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने पलायन केले. अपघाताची माहीती मिळताच अकोट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचानामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे. अपघातात ठार झालेल्या युवकाची ओळख पटली नाही. अकोट ते अकोला मार्गाचे काम गत काही वर्षांपासून रखडलेले असून, या मार्गावर अपघात होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. आतापर्यंत अनेकांचे बळी या मार्गावर गेले आहेत.

Web Title: On Akot-Akola road, a truck crushed a two-wheeler