शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!

By admin | Updated: February 12, 2015 01:19 IST

विकास तर होईलच; आयुक्त सोमनाथ शेटे यांचे मत.

अकोला : उत्पन्न वाढीची समस्या अनेक महापालिका, नगरपालिकांना भेडसावते. यामुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील. विकास कामे तर होतीलच; परंतु नागरिकांची खरी गरज लक्षात घेता, अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याचे मत आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बुधवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. अकोला शहराच्या विकासासाठी मागील १४ वर्षांपासून भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नरत असल्याचे चित्र आहे. एकीकडे विकास कामांचे दिवास्वप्न रंगविल्या जात असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेतल्यास प्रशासनाच्या प्रामाणिकतेची कीव येते. शहरात ठिकठिकाणी पसरलेली घाण, अस्वच्छता अकोलेकरांच्या मुळावर उठली असून, प्रत्येक घराला आजाराचा विळखा आहे. धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असताना पाण्याची प्रचंड नासाडी सुरू आहे. अकोलेकरांजवळून कर वसूल करणारी महापालिका साध्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरली. यासह विविध मुद्यांवर नवनियुक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांना विचारणा केली असता, त्यांनी या सर्व समस्यांचे मूळ उत्पन्न वाढीत दडल्याचे नमूद केले. उत्पन्नाअभावी थकीत वेतनाची समस्या निर्माण होते. त्याचा परिणाम मूलभूत सुविधांवर होतो. वर्धा नगर परिषदेच्या माध्यमातून प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छता मोहिमेवर भर देण्यात आला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्‍याची गंभीर समस्या निर्माण होते. त्यामुळे ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणे नागरिकांनीसुद्धा बंद केले पाहिजे. पथदिवे, स्वच्छ रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांसह अकोलेकरांच्या समन्वयाची गरज त्यांनी अधोरेखित केली.