शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आज धावणार अकोलेकर!

By admin | Updated: January 11, 2015 01:11 IST

आयएमए वॉकथॉन; जगविख्यात धावपटू मिल्खासिंग यांच्या उपस्थितीत विविध गटात होणार स्पर्धा.

अकोला : इंडियन मेडिकल असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉकथॉन स्पर्धा रविवार, ११ जानेवारी रोजी होत आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षीच्या आयएमए वॉकथॉनमध्ये अवयव दान, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री जनधन योजना याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. अवयवदानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे डॉ. रवी वानखडे अकोल्यात येणार आहे. स्पर्धेला सकाळी ७.३0 वाजता आयएमए हॉल सिव्हिल लाइन येथून सुरुवात होईल. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, गोपीकिसन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, महापौर उज्ज्वला देशमुख, क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा ३ कि.मी., ६ कि.मी. व १0 कि.मी. ची राहणार आहे. त्यासाठी ३ वेगवेगळे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. मार्गावर स्वच्छता, अल्पोपाहार, औषधोपचारसह अवयवदान, स्वच्छता अभियान, जनधन योजनांच्या प्रचाराचे फलक लावण्यात येतील. या निमित्ताने छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहेत. विविध समित्यांचेदेखील गठण करण्यात आले आहे. स्पर्धेचे पंच म्हणून क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनात धनंजय भगत, शरद कोकाटे, अशोक मंडले, प्रभाकर रुमाले आदींसह अनेक संघटनांचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. *मिल्खासिंगची उपस्थिती फ्लाईंग शिख म्हणून प्रसिद्ध असलेले जगविख्यात धावपटू मिल्खासिंग या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणार आहे. शनिवारी सायंकाळीच ते अकोल्यात दाखल होणार होते, मात्र, त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रमात ऐन वेळेवर बदल झाला आहे. त्यामुळे ते स्पर्धेच्या उद्घाटनाच्यावेळेपर्यंंत अकोल्यात दाखल होतील, असे आयोजनांतर्फे सांगण्यात आले.