शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अकोल्यातील शेतकरी आंदोलनाची ‘यशवंत’ अखेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:47 IST

सोमवारी सायंकाळपासून अकोला पोलीस मुख्यालय मैदानावर  सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस  यांना सिन्हा यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी यशवंत सिन्हा  यांच्यासोबत चर्चा करून शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

ठळक मुद्देसिन्हा यांच्याशी चर्चा : मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानाफेडच्या जाचक अटी रद्द करण्यासह सर्व मागण्या मान्यअंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत  सिन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात, शेतकरी जागर मंचच्या वतीने, सोमवारी सायंकाळपासून अकोला पोलीस मुख्यालय मैदानावर  सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस  यांना सिन्हा यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी यशवंत सिन्हा  यांच्यासोबत चर्चा करून शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. हे यश यशवंत  सिन्हा किंवा शेतकरी जागर मंचचे नसून, संपूर्ण शेतकर्‍यांचे असल्याचे प्रतिपादन  सिन्हा यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा करताना  केले.स्वराज्य भवनात ३ डिसेंबर रोजी पार पडलेल्या कापूस, सोयाबीन, धान परिषदेतून  शेतकरी आंदोलनाची सुरुवात होऊन, हे आंदोलन पोलीस मुख्यालयाच्या मैदाना पर्यंत पोहोचले. चार दिवसांच्या आंदोलनाची चर्चा देशपातळीवर पोहोचली. यशवंत  सिन्हा व रविकांत तुपकर यांच्या शिवाय शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे,  जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, ज्ञानेश्‍वर सुलताने, सम्राट डोंगरदिवे, सय्यद  आसिफ  यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले. या  आंदोलनाला स्थानिक पातळीसह देशपातळीवर सर्वच राजकीय पक्षांचा प्रतिसाद  मिळाला. बुधवारी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी म्हणून  तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी, आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या प्रीती  मेनन, बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, शेतकरी नेते माजी आ.  शंकरअण्णा धोंडगे, शिवसेनेचे आमदार गोपीकिसन बाजोरिया, भारिप-बमसंचे  जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, बुलडाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष  अँड.नाझेर काझी आदींनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावून आंदोलनाला पाठिंबा  जाहीर केला. या घडामोडी घडत असतानाच, बुधवारी सकाळी ११ वाजता,  यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांना चर्चा  करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणविस यांचा निरोप आला. यावेळी मुख्यमंत्री फडणविस यांनी, यशवंत सिन्हा  यांना शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे सांगत, आंदोलन मागे  घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलनात सक्रिय सहभागी शेतकर्‍यांच्या समोर  यशवंत सिन्हा यांनी, जाहीरपणे मुख्यमंत्री फडणविस यांनी मागण्या मान्य केल्या  आहेत, त्यामुळे हे आंदोलन थांबवित असल्याचे स्पष्ट केले. 

नाफेडच्या जाचक अटी रद्द करण्यासह सर्व मागण्या मान्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी यशवंत सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या  चर्चेदरम्यान, कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसानाचे सर्वेक्षण करू, पंचनामे करून  तातडीने शेतकर्‍यांना आर्थिक मदत देऊ, मूग, उडीद, सोयाबीन शेतमाल विक्रीबाब तच्या जाचक अटी, एकराच्या र्मयादेची अट रद्द करून, शेतकर्‍यांचा संपूर्ण शे तमाल नाफेडमार्फत खरेदी करू, नियमाप्रमाणे शेतमालास हमी भाव देऊ, असे  आश्‍वासन दिलेत, अकोला जिल्हय़ातील ‘ग्रीनलिस्ट’ मधील ६२ हजार ७४९ या  शेतकर्‍यांपैकी ५५ हजार ४१४ लाभार्थ्यांच्या खात्यात दोनशे एकोणचाळीस कोटी,  सव्वीस लाख रुपये रक्कम कर्जमाफी म्हणून जमा केली असून, उर्वरित शे तकर्‍यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येईल,  कृषी पंपाची वीज  जोडणी न तोडण्याबाबत आदेश देण्यात येतील, तसेच सोने तारण कर्जमाफीसाठी  बाद ठरेलेल्या अकोला जिल्हय़ातील ३७ हजार ४९ शेतकर्‍यांबाबत मंत्रीमंडळाच्या  बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासनही फडणविस यांनी दिले, अशी माहि ती सिन्हा यांनी आंदोलनकांना दिली.

अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनसरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन छेडू, असे यशवंत सिन्हा  यांनी आंदोलकांना संबोधित करताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी  सुरू केलेले आंदोलन अनिश्‍चित काळासाठी होते. चार दिवसांच्या  आंदोलनादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांचे फोन आले. त्यांनी भरघोस  पाठिंबा दिला.  राष्ट्रीय पातळीवर अकोला कुठे आहे आणि यशवंत सिन्हा  कुठे  जाऊन बसले, याची चर्चा सुरू झाली; मात्र, अखेर मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या  मागण्या मान्य केल्या. हा विजय  सर्व शेतकर्‍यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्या  मान्य केल्या; परंतु या मागण्यांची पूर्तता, अंमलबजावणी झाली नाही, तर आपण  पुन्हा शेतकर्‍यांसाठी आंदोलनास प्रारंभ करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरYashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरीagitationआंदोलन