शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

अकोला परिमंडळात आॅनलाइन वीज बिल भरण्याचा चढता आलेख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:01 IST

 अकोला : ‘दिवस-रात्र असता आॅनलाइन, मग वीज बिल भरायला का लावता लाइन’, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी आता वीज देयक आॅनलाइन भरण्याची कास धरली आहे.

ठळक मुद्देचार वर्षात १६ कोटींचा वार्षिक भरणा गेला १९१ कोटींवर.महावितरणने अनेक सेवा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या असून, आता वीज ग्राहकही तेवढेच तंत्रस्नेही झाले आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन देयक भरण्याचा कल

अतुल जयस्वाल

 अकोला : ‘दिवस-रात्र असता आॅनलाइन, मग वीज बिल भरायला का लावता लाइन’, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी आता वीज देयक आॅनलाइन भरण्याची कास धरली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन देयक भरण्याचा कल वाढत असल्याचे गत चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१४ या वर्षभरात झालेला १६ कोटी ९७ लाखांचा भरणा वर्ष २०१७ मध्ये तब्बल १९१ कोटी ६ लाख रुपयांवर गेल्याने आॅनलाइन देयक भरण्याचा आलेख चढता असल्याचे अधोरेखित झाले आहे.झपाट्याने बदलणाऱ्या काळासोबत ‘पेपरलेस’च्या दिशेने वाटचाल करणाºया महावितरणने अनेक सेवा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या असून, आता वीज ग्राहकही तेवढेच तंत्रस्नेही झाले आहेत. महावितरणने माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना घरबसल्या बिल देयकाचा भरणा करता यावा म्हणून आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर करीत वर्ष २०१४ मध्ये अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ९४५ वीज ग्राहकांनी १६ कोटी ९७ लाख रुपयांचा आॅनलाइन वीज बिल भरणा केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये ४ लाख १२ हजार २३० वीज ग्राहकांनी ५७ कोटी ३६ लाख रुपये आॅनलाइन भरले. वर्ष २०१६ मध्ये ६ लाख ९६ हजार ५११ वीज ग्राहकांनी १०० कोटी रुपयांचे वीज बिल आॅनलाइन जमा केले. वर्ष २०१७ मध्ये मोठी वाढ होऊन, १३ लाख १३ हजार ४६८ वीज ग्राहकांनी तब्बल १९१ कोटी ६ लाख रुपयांचा आॅनलाइन वीज बिल भरणा केल्याचे महावितरणने जारी केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅपचा वापर!महावितरणच्या ग्राहकांना संकेतस्थळावरून तसेच मोबाइल अ‍ॅपचा वापर करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व नेट बँकिंगद्वारे बिल भरता येते, तरी महावितरणने या दिलेल्या सुविधांचा वापर करून रांगेत वेळ न घालवता कधीही बसल्या जागेवरच वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले आहे.२०१७ मध्ये झालेला जिल्हानिहाय आॅनलाइन भरणाजिल्हा       ग्राहक             रक्कमअकोला     ३,०९,०७२        ५८ कोटी ३७ लाखबुलडाणा    ८,३६,०३८       १०९ कोटी ४ लाखवाशिम     १,६८,३५८         २३ कोटी ८३ लाख-------------------------------------------परिमंडळ    १३,१३४६८         १९१ कोटी ६ लाख

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळAkolaअकोला