शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

अकोला जिल्हा परिषद अध्यक्षाच्या लाचखोर पीएविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:09 PM

चंद्रशेखर गवईने 25 हजारांची मागितली लाच

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांचे पीए तथा जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेला चंद्रशेखर रायभान गवई याच्याविरुद्ध  25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गवईला कारवाईचा संशय आल्याने लाच घेणे टाळून तो जिल्हा परिषदेतून फरार झाला.

जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते. निलंबित शिक्षकाचा निलंबन कालावधी नियमित करून,पगार थकबाकी काढणेसाठी व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याकरीता चंद्रशेखर रायभान गवई याने 25 हजार रुपयांची लाच सदर शिक्षकाकडे मागितली. मात्र शिक्षकाला लाच देणे शक्य नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 23 एप्रिल रोजी साक्षीदार व पंचासमोर पडताळणी केली असता चंद्रशेखर गवई याने शिक्षकाला लाच मागितल्याने सिद्ध झाले.  

अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपी गवईच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. लाचखोर गवईला गुरुवारी अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी जिल्हा परिषदेत पोहचले दरम्यान कारवाईचा संशय आल्याने गवई फरार झाला. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले, पोहवा दामोदर,सुनील राऊत,संतोष दहीहंडी, राहुल इंगळे, सुनील येलोने यांनी केली. 

टॅग्स :Akolaअकोला