शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

अकोला-वाशिम जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या ५५ हजार शेतकर्‍यांचे कर्ज ‘नील’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:45 AM

अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी गुरुवारपर्यंत गत तीन दिवसांत ५५ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करुन, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले.

ठळक मुद्दे२३८ कोटींची रक्कम कर्जखात्यात जमातीन दिवसांत दोन जिल्ह्यातील कर्जमाफी!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी गुरुवारपर्यंत गत तीन दिवसांत ५५ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करुन, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर, संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून कर्जमाफी देण्यात येत आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात दोन लाख थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी ६२ हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. ग्रीन याद्यांमधील ६२ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी २८७ कोटींची रक्कमदेखील प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने याद्यांची पडताळणी करून, शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. गुरुवार, ३0 नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील ५५ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत जमा करण्यात आली असून, संबंधित शेतकर्‍यांचे कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. त्यामुळे जिल्हा मध्ययवर्ती सहकारी बँकेच्या दोन्ही जिल्ह्यातील आतापर्यंत ५५ हजार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी