शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

अकोला : परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ झाली  ‘एअरलॉक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:40 AM

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात शिवशाही सेवा सुरू केली. मात्र, या शिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवशाहीवर सातत्याने टीका होत असताना, अकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअरलॉकमुळे बंद पडली.

ठळक मुद्देशिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहेअकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअरलॉकमुळे बंद पडलीप्रवाशांना येथेच उतरावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात शिवशाही सेवा सुरू केली. मात्र, या शिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवशाहीवर सातत्याने टीका होत असताना, अकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअरलॉकमुळे बंद पडली. प्रवाशांना येथेच उतरावे लागले. सकाळपासून अनेक तास शिवशाही चौकात नादुरूस्त अवस्थेत उभी असल्याने रविवारी शिवशाही लक्षवेधी ठरली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करून शिवशाहीचा नवीन प्रकल्प आणला. यासाठी शेकडो नवीन गाड्या आणि नवीन करार केला गेला. त्यावर अजूनही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर टीका सुरूच आहे. राज्यात शिवशाही धावत असताना अकोल्याच्या वाट्यालाही आधी दोन, नंतर अलीकडेच आणखी एक, अशा एकूण तीन गाड्या आल्यात. पुणे- अकोला आणि अकोला-पुणे या तीन गाड्या आता अकोला आगार क्रमांक दोनमधून धावत आहेत. रविवारी अकोल्यात येणारी एमएच ४६ बीबी ५४४३ क्रमांकाची पुणे-अकोला शिवशाही पोहोचली. मात्र, बायपासजवळच्या खासगी लक्झरी स्टॅन्डजवळ अचानक त्यामध्ये बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना येथेच उतरावे लागले. शिवशाहीच्या देखभालीची जबाबदारी खासगी व्यवस्थेकडे असल्याने चालकांनी कंपनीच्या व्यवस्थापनास कॉल करून घटनास्थळावर बोलाविले. अनेक तास कंपनीचे मॅकेनिक घटनास्थळावर न पोहोचल्याने शिवशाही बायपास  मार्गावर अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत होती. याबाबत एसटी मंडळाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता, त्यांनी एअरलॉक झाल्याने शिवशाही बंद पडली होती, असे सांगितले. नवीन गाड्यांमध्ये डीझल सेंसर असून, चालक बदलला की ही स्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरstate transportराज्य परीवहन महामंडळShivshahiशिवशाही