अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार!

By Atul.jaiswal | Published: January 25, 2024 01:27 PM2024-01-25T13:27:21+5:302024-01-25T13:27:54+5:30

ही रेल्वे आता मार्च २०२४ अखेरपर्यंत धावणार आहे.

Akola-Tirupati special express will run till the end of March! | अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार!

अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार!

अकोला : सणासुदीच्या दिवसांत होत असलेली अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनेअकोला-तिरुपती-अकोला साप्ताहिक एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता मार्च २०२४ अखेरपर्यंत धावणार आहे.

नांदेड रेल्वे विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.

०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी २ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर १२:१५ वाजता येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण १८ फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने अकोलेकर प्रवाशांना तिरुपतीला जाणे शक्य होणार आहे.

Web Title: Akola-Tirupati special express will run till the end of March!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.