शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

अकोला : वेतनवाढीसाठी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन; कर्मचार्‍यांनी केली अहवालाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:00 PM

अकोला : वेतनवाढसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत राज्यभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अकोला आगार क्रमांक एकवर ही होळी करून कर्मचार्‍यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देआगार क्रमांक एकमध्ये केली उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळीअकोल्यातील कर्मचार्‍यांनी नोंदविला राज्यव्यापी आंदोलनात सहभाग 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वेतनवाढसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत राज्यभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अकोला आगार क्रमांक एकवर ही होळी करून कर्मचार्‍यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला. वेतनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिवाळीच्या वेळी सलग चार दिवस कर्मचार्‍यांनी चक्का जाम आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने मध्यस्थी करून उच्चस्तरीय समिती गठित केली. उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेले मुद्दे संघटनेने फेटाळून लावले. दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी २५ जानेवारी रोजी करण्याचा इशारा दिला गेला. २५ जानेवारीपर्यंतही कोणतीही दखल न घेतल्या गेल्याने अखेर एसटी कामगार संघटनेच्या वतीने गुरुवारी राज्यभरात हे आंदोलन केले गेले.  अकोला विभागाच्या वतीने अकोला आगार क्रमांक एकमध्ये अहवालाची होळी करण्यात आली. अविनाश जहागिरदार, अनिल गरड आणि देवानंद पाठक यांच्या नेतृत्वात छेडण्यात आलेल्या या आंदोलनात अकोला आगार डेपोचे अध्यक्ष राजीक देशमुख, सचिन हाताळकर, सईदखान ईर्शाद अहमद, रहीमभाई, देशमुख, महेंद्र राठोड, शोभा गोंड, के.बी. पाटील, एम.एस. शेख, हसन मोहम्मद, दिनोदिया गोरे, ए.आर. राठोड, एस.एस. कात्रे, एस. डी. मेतकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Akola Bus Standअकोला बस स्थानकST Strikeएसटी संपagitationआंदोलन