शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

अकोला: शहरात जंतुनाशक फवारणीला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 1:27 PM

नगरसेवकही प्रभागात ठिकठिकाणी फवारणी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांवर अत्याधुनिक मशीनद्वारे जंतुनाशक फवारणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. याव्यतिरिक्त नगरसेवकही प्रभागात ठिकठिकाणी फवारणी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कोरोना विषाणूचे आयुर्मान लक्षात घेता, प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनासुद्धा खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी व एकमेकांसोबत संपर्क टाळणे, हाच प्राथमिक व प्रभावी उपाय असल्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्या पृष्ठभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर जंतुनाशक फवारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभागातील अंतर्गत भागात पाच ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवर झोननिहाय फवारणी करण्याचे निर्देश आहेत. फवारणीसाठी ५०० लीटर क्षमता असलेले ४ प्रोटेक्टर मशीनद्वारे किटाणू व जंतुनाशक (सोडियम हाइपोक्लोराईड) औषधीचा वापर केला जात आहे. श्री प्राजल गोपनारायण, आदर्श फार्म सर्व्हिसेस (युनिमार्ट अकोला), यू.पी.एल. इंडिया लिमिटेड, मुंबई यांनी अत्याधुनिक फवारणी यंत्र नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहेत. त्यावरील संचालकाला मनपाकडून मानधन दिले जाईल.

नगरसेवकही सरसावले!प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सुनीता अग्रवाल, आशिष पवित्रकार, प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका रश्मी अवचार, प्रभाग ८ चे नगरसेवक सुनील क्षीरसागर व तुषार भिरड प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणीसाठी सरसावल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस