शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

अकोला : जिल्हा परिषदेच्या आणखी ३२५ शिक्षकांना नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:50 AM

अकोला : शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी आता ज्या शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणात जातीचा प्रवर्ग नमूद नाही, अशा जवळपास ३२५ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्या नियुक्तीचा जातप्रवर्ग कोणता, तसेच बिंदूनामावलीत त्यांचे नाव कोणत्या जातप्रवर्गात समाविष्ट करावे, याचा खुलासा मागवणारी नोटीस जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून लवकरच दिली जाणार आहे.

ठळक मुद्देनियुक्तीचा जात प्रवर्ग कोणता, याचा द्यावा लागणार खुलासा

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी आता ज्या शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणात जातीचा प्रवर्ग नमूद नाही, अशा जवळपास ३२५ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्या नियुक्तीचा जातप्रवर्ग कोणता, तसेच बिंदूनामावलीत त्यांचे नाव कोणत्या जातप्रवर्गात समाविष्ट करावे, याचा खुलासा मागवणारी नोटीस जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून लवकरच दिली जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आस्थापनेची संवर्गनिहाय बिंदूनामावली २00७ मध्ये तयार करण्यात आली. त्या बिंदूनामावलीत प्रचंड गोंधळ करण्यात आला. ती अंतिम करण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयातील मागास वर्ग कक्षाने अनेक आक्षेप नोंदविले. त्यामध्ये आतापर्यंत अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-अ, भज-ब, भज-ड, इतर मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गात सरळ सेवेने किंवा पदोन्नती दिलेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसंदर्भात निवड समितीने केलेल्या प्रवर्गनिहाय याद्या, नियुक्ती आदेश, जातवैधता प्रमाणपत्र, तसेच आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती आदेश, एसटीच्या पदावर गैरआदिवासी कर्मचार्‍यांची नियुक्ती, ज्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचार्‍यांनी जातवैधता सादर केली नाही, १५ जून १९९५ नंतर विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एसटी प्रवर्गात नियुक्ती दिली, त्यांच्या सेवा समाप्त करणे, या सगळ्या गंभीर प्रकारांची संपूर्ण माहिती तसेच जातवैधता प्रमाणपत्र न घेताच नियुक्ती देणार्‍या सर्व संबंधितांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश ६ जुलै २0११ रोजी देण्यात आला. त्यावरही कोणावरच कारवाई झाली नाही. त्यानंतर ८ जुलै २0११ रोजी विधिमंडळाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण समितीने या गंभीर प्रकाराची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जानेवारी २0१७ मध्ये जिल्हय़ातील १४७ शिक्षकांना गटशिक्षणाधीकार्‍यांमार्फत नोटीस बजावल्या. त्यापैकी ४४ शिक्षकांनी संधी देऊनही जातवैधता सादर केली नाही. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेत नियुक्त ३१ शिक्षकांना ऑक्टोबरमध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यावर मागासवर्ग कक्षाने अनेक आक्षेप घेतले. त्यामध्ये ज्या शिक्षकांच्या नियुक्तीनुसार नावापुढे जातप्रवर्ग नमूद नाही, त्यांची अचूक माहिती सादर करण्याचे म्हटले आहे. त्यानुसार जवळपास ३२५ शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये जातप्रवर्ग नमूद नसल्याची माहिती आहे. त्या सर्व शिक्षकांना नोटीस देत त्यांच्या नियुक्तीच्या जातप्रवर्गाचा पुरावा मागीतला जाणार आहे. शिक्षकांकडे पुरावा नसल्यास बिंदूनामावलीत त्यांचे नाव कोणत्या प्रवर्गात समाविष्ट केल्यास त्यांचा आक्षेप नसेल, यासाठीचा पर्यायही मागवला जाणार आहे. त्यामुळे बिंदूनामावली अंतिम होण्यास आणखी बराच काळ लागण्याची शक्यता आहे. 

फायली गहाळसाठी प्रभार नसलेल्यांनाही नोटीसजिल्हा परिषद शिक्षण विभागातून आंतरजिल्हा बदलीतील ७६ फायली गहाळ प्रकरणात अधिकारी, कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या. त्यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी एस.बी.नृपनारायण यांनी शिक्षण विभागातील आस्थापना किंवा आंतरजिल्हा बदलीचा प्रभार कधीच घेतला नाही. तरीही त्यांच्यावर ७ फायलींची जबाबदारी देत नोटीस देण्यात आली. याप्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी चौकशी करून जबाबदारी निश्‍चित करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक