शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

अकोला : शिवरच्या युवकाची हत्याच; शवविच्छेदन अहवालात हत्या उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:06 AM

अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते होते; मात्र शवविच्छेदन अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे समोर आले आहेसिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते होते; मात्र शवविच्छेदन अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.शिवर येथील रहिवासी गणेश अशोक सुरतकर (३0) हा रविवारी सकाळपासून दारूच्या नशेत होता. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरत असताना रात्रीच्या दरम्यान बसस्थानक पोलीस चौकीतील एका पोलीस कर्मचार्‍याने त्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. गणेश सुरतकरची पत्नी दुर्गा व शेजारी राहणारे उमेश निकम हे बसस्थानक पोलीस चौकीत सुरतकर यांना घेण्यासाठी आले. चौकीतील पोलीस कर्मचारी दाते यांनी नांेद घेऊन गणेश सुरतकर यांना ताब्यात दिल्याची माहिती सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात सांगितली. ही नोंद पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत घेण्यात आली; मात्र रात्री उशीरा गणेश सुरतकर यांचा अचानकच मृत्यू झाल्याची माहिती बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचार्‍यांना मिळाली. त्यांनी ठाणेदार अन्वर शेख यांना माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित गणेश सुरतकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. मंगळवारी सायंकाळी उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये गणेश सुरतकर यांची मारहाण करून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. बसस्थानक परिसरातील एका अंड्याच्या गाडीवर गणेश सुरतकर यांना मारहाण झाल्याची माहिती असून, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख त्या दिशेने तपास करीत आहेत.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMurderखूनCrimeगुन्हाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन