शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

बेघर निवाऱ्याच्या दुरूस्तीसाठी महापालिकेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 11:18 IST

Akola Municipal Corporation News मनपा प्रशासनाने निवाऱ्याच्या दुरूस्तीसाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र समाेर आले आहे.

ठळक मुद्देसुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिले हाेते. येत्या २६ जानेवारी राेजी पालकमंत्री बेघर निवाऱ्याची पाहणी करतील.
अकाेला : महापालिकेच्यावतीने अकाेटफैल पाेलीस ठाण्यासमाेरील मनपा हिंदी मुलांची शाळा क्रमांक ३च्या परिसरात बेघरांसाठी उभारलेल्या निवाऱ्यात मूलभूत साेयी सुविधांचा अभाव असल्याने सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिले हाेते. येत्या २६ जानेवारी राेजी पालकमंत्री बेघर निवाऱ्याची पाहणी करतील, या धास्तीपाेटी मनपा प्रशासनाने निवाऱ्याच्या दुरूस्तीसाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र समाेर आले आहे.शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, जुने बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसर तसेच मुख्य रस्त्यालगत जागा दिसेल त्याठिकाणी बेघर नागरिकांनी ठाण मांडल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या ‘एनयुएलएम’ विभागाच्यावतीने अशा बेघर नागरिकांचा शाेध घेऊन त्यांना बेघर निवाऱ्यात मुक्कामासाठी पाठवले. अकाेटफैल पाेलीस ठाण्यासमाेर मनपाच्या हिंदी मुलांची शाळा क्रमांक ३च्या परिसरात बेघरांचा निवारा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी मूलभूत साेयी सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट दिली असता सुविधांची पूर्तता नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले हाेते. इमारतीची डागडुजी करून स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून इतर साेयी सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले हाेते. दरम्यान, येत्या २६ जानेवारी राेजी पालकमंत्री बेघर निवाऱ्याची पाहणी करतील, या विचारातून मनपा प्रशासनाने निवाऱ्याच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.गतीमंद व्यक्ती पळून जातात!शहरातील प्रमुख रस्त्यालगत काही गतीमंद महिला तसेच पुरूष आढळून येतात. अशा व्यक्तिंना मनपाने बेघर निवाऱ्यात मुक्कामासाठी हलविले असता एक दाेन दिवसांत अशा व्यक्ती पळून जात असल्याची समस्या निर्माण झाली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर ठाणमागील काही दिवसांपासून मनपाने बेघर नागरिकांना शाेधण्याची माेहीम बंद केल्याचे परिणाम दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य रस्त्यालगत बेघर व्यक्तींनी ठाण मांडल्याचे दिसत आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची आवारभिंत, सिव्हील लाइन पाेलीस ठाण्याची आवारभिंत आदी ठिकाणचा समावेश आहे. मनपाने अशा नागरिकांना बेघर निवाऱ्यात स्थानांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका