Akola Municipal Corporation Mayor Announced: राज्यातील २९ महापालिकांपैकी अकोला महापालिकेला अखेर महापौर मिळाला आहे. भाजप प्रणित शहर सुधार आघाडीने आपले संख्याबळ ठामपणे सिद्ध करत महापौर व उपमहापौर दोन्ही पदांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापौरपदासाठी भाजपच्या शारदा खेडकर यांना ४५ मते मिळाली, तर उद्धव सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांना केवळ ३२ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले, तर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी थेट भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून राजकीय गणित पूर्णपणे बदलून टाकले. त्यामुळे विरोधकांकडून ३६ चा दावा केला जात असलेला आकडा प्रत्यक्षात ३२ वर घसरला आणि सत्तेचे पारडे निर्णायकरीत्या भाजपकडे झुकले.
महापौर निवडीनंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहिला. शहर सुधार आघाडीचे उमेदवार अमोल गोगे यांना ४५ मते मिळून ते उपमहापौरपदी निवडून आले, तर काँग्रेसचे उमेदवार आजाद खान (अलीयार खान) यांना ३२ मते मिळाली. यामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणावर भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून विविध पातळ्यांवर जोरदार हालचाली, संपर्क आणि राजकीय जुळवाजुळव सुरू होती. मात्र एमआयएमचा तटस्थ निर्णय आणि अपक्ष नगरसेवकाचा भाजपला मिळालेला पाठिंबा या दोन घटकांनी विरोधकांच्या सर्व गणितांवर पाणी फेरले. परिणामी, भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे संख्याबळ ४५ वर स्थिरावले आणि विरोधकांना अनपेक्षित धक्का बसला.
या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, महापालिकेतील सत्ता केवळ संख्येवर नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या राजकीय निर्णयांवर ठरते. ४५ मतांच्या स्पष्ट बहुमताने शारदा खेडकर आणि अमोल गोगे हे दोघेही आता महापालिकेच्या सर्वोच्च पदांवर विराजमान झाले असून, आगामी काळात महापालिकेच्या धोरणांवर शहर सुधार आघाडीचा ठसा उमटण्याची शक्यता आहे.
अकोला महापालिका: पक्षनिहाय संख्याबळ
एकूण जागा: 80बहुमताचा आकडा: 41
| पक्ष | नगरसेवक |
|---|---|
| भाजप | ३८ |
| काँग्रेस | २१ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०६ |
| शिवसेना (शिंदे गट) | ०१ |
| राष्ट्रवादी (अजित पवार गट) | ०१ |
| राष्ट्रवादी (शरद पवार गट) | ०३ |
| वंचित बहुजन आघाडी | ०५ |
| एआयएमआयएम | ०३ |
| अपक्ष | ०२ |
इतर महापालिकांचे महापौर लवकरच ठरणार
राज्यातील २९ पैकी पहिल्या महापालिकेचा महापौर ठरल्यानंतर आता उर्वरित महापालिकांमधील महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे.
Web Summary : BJP's Sharda Khedkar secured Akola's mayoral position with 45 votes, defeating Shiv Sena's Surekha Kale. Amol Goge became Deputy Mayor. MIM's neutrality and an independent's support boosted BJP, solidifying their control in the municipal corporation. The victory highlights strategic political decisions.
Web Summary : भाजपा की शारदा खेडकर 45 वोटों से अकोला की महापौर चुनी गईं, शिवसेना की सुरेखा काले को हराया। अमोल गोगे उपमहापौर बने। एमआईएम की तटस्थता और एक निर्दलीय के समर्थन ने भाजपा को बढ़ावा दिया, जिससे नगर निगम में उनकी पकड़ मजबूत हुई। यह जीत रणनीतिक राजनीतिक फैसलों को दर्शाती है।