शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी अकोला मनपाची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 5:26 PM

अकोला: शहराच्या भुजल पातळीत घसरण झाल्यामुळे नागरिकांच्या बोअर कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात नव्याने बोअर खोदल्या जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेऊन जनजागृती सुरु केली आहे. जनजागृतीसोबतच निर्माणाधिन इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय इमारतींना कम्प्लीशन सर्टिफिकेट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला: शहराच्या भुजल पातळीत घसरण झाल्यामुळे नागरिकांच्या बोअर कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात नव्याने बोअर खोदल्या जात असल्याचे चित्र आहे. पाण्याचा बेसुमार उपसा होत असला तरी त्याबदल्यात नागरिकांकडून जल पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) ठोस प्रयत्न होत नसल्यामुळे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेऊन जनजागृती सुरु केली आहे. जनजागृतीसोबतच निर्माणाधिन इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.छतावरील पाण्याचे जमिनीत पुनर्भरण करण्यासाठी बोटावर मोजता येणार अकोलेकर वगळल्यास इतरांमध्ये निरुत्साह असल्याचे चित्र पाहता मनपा प्रशासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मनपातील नगररचना विभागाने २०१७-१८ मध्ये ३०२ इमारतींना बांधकाम परवानगी दिली असून निर्माणाधिन इमारतींच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले की नाही, याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय इमारतींना कम्प्लीशन सर्टिफिकेट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या दप्तरी शहरातील ७० कमर्शियल कॉम्पलेक्स, रहिवासी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले असले तरी ते जुजबी स्वरूपाचे असल्याचे चित्र आहे. जलपुनर्भरणासाठी नागरिकांमध्ये निरुत्साह असल्यानेच शहराची भुजल पातळी खालावली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका