शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर अकोल्याची बाजारपेठ गजबजली

By admin | Updated: October 22, 2014 00:59 IST

दिवाळीनिमित्त ग्राहकांच्या पसंतीच्या विविध आकर्षक योजनांची लयलूट

अकोला : दिवाळी सण हा शुभ मुहूर्तच. या मुहूर्तावर वस्तूंची खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा असतो. विधानसभा निवडणुकीनंतर दिवाळीसाठी अकोल्याची बाजारपेठ सज्ज झाली असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक योजना विक्रेत्यांनी आणल्या आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अकोल्याची बाजारपेठ सज्ज झाली आहे. सोन्या-चांदीची दुकाने सजली आहेत, विविध इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवरही विक्रेत्यांनी विविध योजना आणल्या आहेत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. मोबाइलचे विविध ब्रँड बाजारात आले आहेत. एक हजार ते ५0 हजार रुपयांपर्यंतचे मोबाइल हँडसेट हजर स्टॉकमध्ये सर्व शोरूममध्ये उपलब्ध आहेत. मोटारसायकल खरेदीकडे ग्राहकांचा विशेष कल दिसून असून, ४५ हजारांपासून तर एक लाख रुपये किमतीपर्यंतच्या विविध कंपन्यांची दुचाकी शोरूममध्ये उपलब्ध आहेत. विविधरंगी मोटारसायकलींचा स्टॉक विक्रेत्यांनी उपलब्ध केला असून, किमान डाउन पेमेंटवर मोटारसायकल खरेदी करता येत असल्याने लोन सुविधेकडे वाहन खरेदी करणार्‍या ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे.दहा हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत फ्रिज, तर १२ हजारांपासून चार लाखांपर्यंत एलसीडी, एलईडी व प्लाझमा टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांच्या डीलरनी या वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक योजना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मांडल्या आहेत. पेन ड्राइव्ह, सीडी प्लेअर, मुव्ही पॅक अशा भेटवस्तूंचा यामध्ये समावेश आहे. सहा किलोच्या वॉशिंग मशीनच्या खरेदीवर अन्य वस्तू फ्री ठेवली आहे. आठ ते ५0 हजार रुपयांपर्यंतच्या वॉशिंग मशीन बाजारात उपलब्ध असून, या वस्तू स्क्रॅच कार्डवर देण्याची योजना आहे. या विविध योजना ग्राहकांच्या पसंतीला लक्षात घेऊन सुरु करण्यात आल्या आहेत. दिवाळी निमित्त त्याला प्रतिसाद मिळत आहे.