शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अकोल्यातील अलंकार मार्केटजवळ २७ लाखांची रोकड पकडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:38 AM

एका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याच्या माहितीवरून स्थानिक  गुन्हे शाखेने छापा घालून २७ लाख ५४ हजार ४३0 रुपयांची रोकड मंगळवारी रात्री अलंकार  मार्केटजवळून जप्त केली. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला पलकभाई रमनभाई पटेल (२६, रा. रणपिसे नगर) हा लाखो  रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

ठळक मुद्देएका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याची माहितीमिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातला व रोकड जप्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याच्या माहितीवरून स्थानिक  गुन्हे शाखेने छापा घालून २७ लाख ५४ हजार ४३0 रुपयांची रोकड मंगळवारी रात्री अलंकार  मार्केटजवळून जप्त केली. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला पलकभाई रमनभाई पटेल (२६, रा. रणपिसे नगर) हा लाखो  रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक  चंद्रकांत ममताबादे, अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजीद, एजाज अहमद, रवी इरचे यांनी  दुचाकीवरून जाणार्‍या पलकभाई पटेल याला अलंकार मार्केटजवळ पकडले. त्याच्याकडील  बॅगेची तपासणी घेतली असता, त्यात लाखो रुपयांची रोकड आढळून आली. त्याला स्थानिक  गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. तेथे त्याच्याकडून रक्कम जप्त केली असून,  त्या रकमेची मोजणी करण्यात आली. पलकभाई पटेलने दिलेल्या माहितीवरून त्याच्याकडे २७  लाख ५४ हजार ४३0 रुपये असल्याचे समोर आले आहे. या रकमेमध्ये दोन हजार, पाचशे  आणि शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल आहेत. ही रक्कम कशाची आहे, याचे कागदपत्र तो  पोलिसांसमोर दाखवू शकला नाही. त्यामुळे ही रक्कम हवालाची असल्याचा पोलिसांना संशय  आहे. पोलिसांनी पलकभाई पटेल याला ताब्यात घेतले. आयकर विभागाकडून रकमेबाबत  चोकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरेल.

टॅग्स :Crimeगुन्हाMONEYपैसाAkola cityअकोला शहर