शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वोपचार ‘व्हेंटिलेटर’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 10:29 IST

आंतरवासिता डॉक्टरांच्या बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप वाढला आहे.

- प्रवीण खेतेअकोला: सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा सर्वाधिक भार आंतरवासिता डॉक्टरांवरच असतो. अशातच आंतरवासिता डॉक्टरांच्या बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. डॉक्टरांच्या बदल्यांमुळे रुग्णसेवेचा भार आणखी वाढणार म्हणून आंतरवासिता डॉक्टरांनी मंगळवारपासून आंदोलन पुकारल्याने येथील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.‘एमबीबीएस’चा निकाल लागताच अनेक जण प्रॅक्टिससाठी इतर शहरात जाण्याच्या तयारीत असतात. नियमानुसार, २५ टक्के बदल्या मेरिट बेसवर केल्या जातात; परंतु यामध्ये अनेक जण राजकीय ओळखीचा फायदा घेत महाविद्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्रही मिळवितात. यंदाही तसेच झाले; पण महाविद्यालयाकडून मोठ्या संख्येने दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रामुळे रुग्णसेवेचा भार इतर आंतरवासिता डॉक्टरांवर येणार आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी मंगळवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड कमी आहे. काही विभागामध्ये पदव्युत्तर विद्यार्थीच नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा संपूर्ण भार आंतरवासिता डॉक्टरांवर येतो. अशा परिस्थितीत नियमबाह्य डॉक्टरांच्या बदल्यांचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो.लोक प्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज!स्थानिक लोक प्रतिनिधींनी रुग्णालयाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यास सर्वोपचार रुग्णालयाची परिस्थिती बदलण्यास मदत होऊ शकते; परंतु राजकीय नेत्यांच्या ओळखीचा फायदा बदलीसारख्या प्रकरणात घेतल्या जातो. त्यामुळे येथील स्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत आहे.अशी आहे डॉक्टरांची संख्या...९१ कनिष्ठ निवासी डॉक्टर, ३९ वरिष्ठ निवासी डॉक्टर, ३९ मेडिकल आॅफिसर, २१ प्राध्यापक, ४७ सहायक प्राध्यापक, ३० पीजी डॉक्टर.नियमानुसारच प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जोपर्यंत विद्यापीठ ना-हरकत प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत डॉक्टरांची बदली होणार नाही.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय