शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा औषधांचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:54 IST

हापकिनकडे केलेल्या मागणीनुसार महत्त्वाची यंत्रसामग्री, सर्जिकल साहित्य आणि औषधांचा पुरवठा अद्यापही सर्वोपचारला झाला नाही.

अकोला : गत वर्षभरापासून सर्वोपचार रुग्णालयात लहान मुलांच्या सलाइन्स, ताप, पोटदुखीच्या औषधांसह इतर महत्त्वाच्या इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे. मध्यंतरी हाफकीनकडून काही औषधं आणि सर्जिकल साहित्याचा पुरवठा झाला, तरी उपलब्ध औषधसाठा तीन ते चार महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा नसल्याने येथे औषध टंचाई कायम आहे. त्यामुळे खासगीतूनच औषध खरेदी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्याचा रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे.खासगी दवाखाना किंवा रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नाही. म्हणून हजारो रुग्ण दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथे अत्यल्प खर्चात त्यांच्यावर उपचार होत असून, नियमानुसार नि:शुल्क औषधेही दिली जातात; मात्र गत काही दिवसांपासून येथे येणारा रुग्ण उपचारानंतर थेट खासगी औषध केंद्रावर औषध खरेदी करताना दिसून येतो. या रुग्णांशी संवाद साधला असता, उपचार स्वस्तात मिळाला तरी सर्वोपचार रुग्णालयात औषधेच उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शिवाय, उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनदेखील डॉक्टर बाहेरूनच आणायला सांगत आहेत. खासगीत उपचार परवडत नाही म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथेही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातर्फे चालू वर्षात हापकिन महामंडळाकडे औषधांची मागणी केली होती. मागणीपैकी केवळ १५० औषधे वर्षभरात सर्वोपचारला मिळाली आहेत. त्यातही मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा कायम आहे.या वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा

  • आयव्ही सेट नाहीत
  • आठ, दहा, बारा आणि १४ क्रमांकाचे फोलीस खॅफेटर नाहीत
  • सीटी स्कॅन करताना उपयोगात आणले जाणारे इंजेक्शन नाहीत.
  • आयसीयुमध्ये आवश्यक असलेले प्लास्टिक एअरवेज नाहीत.
  • ‘ईसीजी’साठी आवश्यक चारपैकी एक ा प्रकारचा रोल नाही.
  • सिजरींगसाठी आवश्यक स्पायनल निडल नाही.

हापकिनकडे केलेल्या मागणीनुसार महत्त्वाची यंत्रसामग्री, सर्जिकल साहित्य आणि औषधांचा पुरवठा अद्यापही सर्वोपचारला झाला नाही. एकूण वितरित अनुदानाच्या दहा टक्के रकमेतून टंचाईच्या काळात स्थानिक खरेदी केली जाते.- संजीव देशमुख, प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय