शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांत यंत्रणांची उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:36 IST

अकोला: मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला.३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

- संतोष येलकर

अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असताना, मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचे वास्तव समोर येत आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना दूर अंतरावरून विहीर-हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ५४३ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला. यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार कृती आराखड्यात प्रस्तावित कामांपैकी ४३९ कामांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांगावांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, ३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असून, पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे!उपाययोजना                             कामेविंधन विहीर                            १०६कूपनलिका                                 ८२खासगी विहिरींचे अधिग्रहण       ३०टँकरद्वारे पाणीपुरवठा              ५५........................................................एकूण                                      २७३२८९ गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार?पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित ५४३ गावांपैकी मार्च अखेरपर्यंत २५५ गावांत २७३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, उर्वरित टंचाईग्रस्त २७९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ८११ कामे केव्हा पूर्ण होणार आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदWaterपाणी