शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के!

By admin | Updated: June 13, 2017 20:07 IST

जिल्ह्यात पातूर तालुका अव्वल; टक्केवारीत मुलींचीच बाजी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर १३ जून रोजी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला आहे. टक्केवारीत यावर्षीही मुलींनीच आघाडी घेतली आहे. ८६.५ टक्के प्राप्त करू न पातूर तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.जिल्ह्यातील ४४१ शाळांमधून २८,४१३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. यातील २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ८४.०२ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात २८,४९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये १५,०३३ मुले तर १३,४६२ मुली होत्या. प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात १४,९७५ मुले तर १३,४३८ मुलींचा समावेश होता. यातील ११,९९६ मुले उत्तीर्ण झाले असून, ११,८७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उतीर्ण होण्यामध्ये मुलींची टक्केवारी ८८.३९ तर मुलांची टक्केवारी ८०.११ एवढी आहे.जिल्ह्यात यावर्षी पातूर तालुक्याने बाजी मारली असून, या तालुक्यात ४१ शाळांमध्ये २१८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात २,१७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १,०१८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ८२.८३ आहे, तर ८५७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याची टक्केवारी ९०.२१ एवढी आहे.दरम्यान, अकोला तालुका निकालात दुसऱ्या क्रमांकावर असून, या तालुक्याचा निकाल हा ८५.०७ टक्के एवढा आहे. बाळापूर तालुक्याचा निकाल ८४.९९ टक्के, बार्शीटाकळी तालुका ८४.९३ टक्के, अकोट तालुका ८१.३५ तर तेल्हारा तालुक्याचा निकाल ८०.५१ टक्के एवढा लागला आहे.

४,५३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण जिल्ह्यात एकूण नोंदणीपैकी प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ४,५३९ विद्यार्थी यावर्षी अनुतीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी १५.९८ एवढी आहे.