शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अकोला मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:30 IST

अकोला : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पदावर खा. संजय धोत्रे यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. एमसीएईआरच्या उपाध्यक्षांना प्रथमच कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार आहे. या निवडीबद्दल खा.धोत्रे यांनी आभार व्यक्त करीत, कृषी विद्यापीठांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

अकोला : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती १ आॅगस्ट रोजी करण्यात आली होती. ते भाजपाचे अकोला मतदारसंघाचे खासदार आहेत. एमसीएईआरच्या उपाध्यक्षांना प्रथमच कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार आहे.महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२ (ब) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पदावर खा. संजय धोत्रे यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी धोरणामध्ये तसेच विस्तार शिक्षण व संशोधनामध्ये सुसूत्रता असावी, याकरिता नियंत्रण व समन्वयासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद राज्यात काम करते.अभियांत्रिकी आणि विधी शाखेचे पदवीधर असलेले खा. धोत्रे हे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी असून, त्यांना स्व. वसंतराव नाईक उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) सारख्या देशात अग्रगण्य असलेल्या बियाणे निर्मिती व प्रक्रिया महामंडळाचे शेतकरी मतदारसंघातून ते सतत पाच वेळा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. कृषी आणि कृषी अनुषंगिक क्षेत्रातील त्यांचा अभ्यास व अनुभव लक्षात घेता, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी धोत्रे यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल खा.धोत्रे यांनी आभार व्यक्त करीत, कृषी विद्यापीठांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे