कॉंग्रेसने दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 18:16 IST2020-10-02T18:15:31+5:302020-10-02T18:16:03+5:30
Akola Congress Agitation जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

कॉंग्रेसने दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
अकोला: शेती व शेतकऱ्यांच्यादृष्टीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांना विरोध करीत, शेतकरी विरोधी तीन विधेयके तातडीने मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आली.
केंद्र सरकारने तीन विधेयकांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा डाव असून, शेतकरी व शेतमजुरांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करीत, शेतकरी विरोधी तीन विधेयके मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमाफृत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.