शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अकोला शहराच्या विकास आराखड्यासाठी शासन सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:35 IST

तोकडी यंत्रणा लक्षात घेता शासनाने महापालिकेत नव्याने नगररचना, विकास योजना कार्यालयाचे गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- आशिष गावंडेअकोला: महापालिका क्षेत्राच्या हद्दवाढीनंतर शहराचा सुधारित विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्यासाठी राज्य शासन सरसावले आहे. ‘डीपी प्लॅन’ तयार करण्यासाठी मनपातील नगररचना विभागाची तोकडी यंत्रणा लक्षात घेता शासनाने महापालिकेत नव्याने नगररचना, विकास योजना कार्यालयाचे गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यालयासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश शासनाने जारी केला आहे.तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात १९९२ मध्ये हद्दवाढ करण्यात आली होती. त्यावेळी लहान उमरीसह इतर परिसराचा नगर परिषद क्षेत्रात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर २००१ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. २००४ मध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्र व जुन्या हद्दवाढीचा सुधारित विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्यात आला. नगररचना विभागाच्या निकषानुसार शहरांचे योग्यरीत्या नियोजन करण्यासाठी ‘डीपी प्लॅन’ तयार केल्यानंतर दर वीस वर्षांनंतर सुधारित ‘डीपी प्लॅन’ तयार करणे क्रमप्राप्त आहे. शहराच्या लोकसंख्येचा निकष लक्षात घेता महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१६ मध्ये मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा निर्णय घेत शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. २०१७ मधील महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता हद्दवाढीच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर २०१६ मध्ये राज्य शासनाने मनपाच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. त्यानंतर आता सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.दोन वर्षांत पूर्ण होईल प्रक्रिया?शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने लातूर येथील उपसंचालक, नगररचना प्रादेशिक योजना कार्यालय महापालिकेत स्थलांतरित करण्याचा निर्णय जारी केला. याचे नामकरण उपसंचालक, नगररचना विकास योजना, विशेष घटक कार्यालय असे करण्यात आले असून, उपसंचालकांसह नगररचनाकार, सहायक नगररचनाकार आदींसह १६ पदांना मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षांत विकास आराखड्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

‘डीपी प्लॅन’कशासाठी?नियोजनबद्ध, शिस्तबद्ध शहर वसविण्यासाठी विकास आराखडा मैलाचा दगड ठरतो. नगररचनाच्या निकषानुसार मुलांचा बौद्धिक, शारीरिक विकास व्हावा, याकरिता खेळांसाठी मैदानांचे आरक्षण, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याकरिता हॉस्पिटलसाठी जागांचे आरक्षण, शहराचे पर्यावरण राखता येईल, या उद्देशातून ग्रीन झोन (हरित पट्टे)साठी जागांचे आरक्षण निश्चित केल्या जाते. यासह प्रशस्त रस्ते, सांडपाण्याचे नियोजन, नो हॉकर्स झोन, हॉकर्स झोन आदींचे ‘डीपी प्लॅन’मध्ये नियोजन करण्यात येते.२०१७ मध्ये ‘डीपी प्लॅन’चा प्रस्तावमनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये शासनाकडे शहराचा सुधारित विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.शहराची हद्दवाढ केल्यानंतर सुधारित ‘डीपी प्लॅन’साठी आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा केला. नियोजनबद्ध शहर वसावे, ही आमची इच्छा आहे. संबंधित विभागाने उद्या भविष्यात ठरावीक जागांवर आरक्षण निश्चित केल्यानंतर सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.-विजय अग्रवाल, महापौर.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका