Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
By नितिन गव्हाळे | Updated: September 30, 2024 21:01 IST2024-09-30T21:00:55+5:302024-09-30T21:01:28+5:30
Akola News: शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
- नितीन गव्हाळे
अकोला - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन तर मातीत गेले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे पिके हातची गेल्यामुळे शासनाने शेतमालाला हमी भाव द्यावा, पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे त्वरीत द्यावे, विज बिल माफ करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कॉंग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनामध्ये माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर, माजी नगरसेवक मो. नौशाद, रवि शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा काळे, कपिल रावदेव, सौरभ चौधरी, शकुर लोदी, राजेश मते, सखावत शाहा, तपस्यु मानकीकर, गणेश कळसकर, चंद्रकांत बोरकर, मनिष मिश्रा, विजय जामनिक, जय वाठुरकर, शंकर लंगोटे, सरदार सर, पंकज राठी, रहेमान बाबु, विनोद मराठे, संदेश वानखेडे, सलिम ईरानी, सचिन तिडके, अजहर शेख, शेख हनिफ, मो.युसुफ, आक्रोश सायखेडे, ईरफान कुरेशी, दत्ता आमले, मो. समिर, राहुल इंगोले, निलेश तोरणे, नौमान खान, जितु वानखडे, गणेश टाले, असलम शाहा. जे.के.राजा, जागृती सरदार, पद्माकर भांडे, सय्यद साबीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.