अकोल्यातील मोठी दुर्घटना, विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटला, ढिगाऱ्याखाली दबून ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:31 IST2025-04-12T14:30:35+5:302025-04-12T14:31:41+5:30

अकोल्यात विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटल्याची घटना घडली. या घटनेत ५ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Akola Accident News goods truck truck overturned on Bike 5 Killed 2 Injured | अकोल्यातील मोठी दुर्घटना, विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटला, ढिगाऱ्याखाली दबून ५ जण ठार

अकोल्यातील मोठी दुर्घटना, विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटला, ढिगाऱ्याखाली दबून ५ जण ठार

अकोल्यात विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ही घटना अकोला-मंगरूळपीर रोडवर दगडपारवा गावाजवळ आज घडली. विटांचा ट्रक उलटल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ माजली.

अकोल्यात गडपारवा गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर उलटला. या घटनेत अनेकजण विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे.

Web Title: Akola Accident News goods truck truck overturned on Bike 5 Killed 2 Injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.