शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:59 PM

जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुन्या कापड बाजारातील तीन मजली इमारत बुधवारी कोसळल्याने पुन्हा एकदा अकोल्यातील शेकडो इमारती शिकस्त-जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आह. महापालिकेच्या चारही झोनमध्ये २७० इमारती शिकस्त असून, त्यांना महापालिका प्रशासनाने नाममात्र नोटीस बजावून ठेवली आहे. या शिकस्त इमारती अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. दरम्यान, निर्मल स्वीट मार्टची तीन मजली इमारत कोसळण्याप्रकरणी खोदकाम करणाऱ्या इमारतीच्या चारही भागीदारांना जबाबदार धरून मनपा नगररचना विभागाने नोटीस बजावली आहे. त्या नोटीसमध्ये ९२.४० चौरस मीटर खोदकाम अनधिकृत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.अकोला महापालिका चार झोनमध्ये विभागली गेली असून, शहरातील बहुतांश ब्रिटिशकालीन इमारती आणि मुख्य बाजारपेठेचा भाग हा उत्तर झोनमध्ये येतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या जुन्या इमारतींमध्ये आजही अनेकजण राहतात. जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही. त्यामुळे अकोल्यात सातत्याने इमारत कोसळण्याच्या घटना घडत असतात. बुधवारी रात्रीदेखील अशीच घटना घडली. १०.३० वाजताच्या दरम्यान जुन्या कापड बाजारातील निर्मल स्वीट मार्टची तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. निर्मल स्वीट मार्टलगत असलेल्या राधास्वामी हार्डवेअरची एका बाजूची भिंत कोसळली आहे. राधास्वामी हार्डवेअरमधील कोट्यवधींचे साहित्यदेखील काढणे अशक्य आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या अपघातात सुदैवाने प्राणहानी टळली. कोसळलेल्या इमारतीच्या बाजूला शू-मॉलच्या मालकाने खोदकाम सुरू केले होते. अतिरिक्त खोदकाम झाल्याने बाजूच्या इमारतीचा पाया खचला आणि तीन मजली इमारत कोसळली. इमारत मालकाने बांधकाम-खोदकामाची परवानगी घेतली असली तरी त्यापेक्षा जास्त खोदकाम त्यांनी केले. मंजूर नकाशानुसार तळघराचे क्षेत्र ४७.२७ चौरस मीटर असले तरी प्रत्यक्ष खोदकाम १३९.६७ चौरस मीटर तळघराचे खोदकाम केलेले आहे. म्हणजेच ९२.४० चौरस मीटर खोदकाम अनधिकृत केले आहे. यामुळे विकास परवाना आदेशाची अवहेलना केली. याप्रकरणात भिकुलाल जमनलाल शर्मा, गजानन नारायण शर्मा, मनीष मांगिलाल शर्मा आणि शिवलाल किसनलाल भिंडा यांना महापालिका अधिनियमान्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे उत्तर झोनच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. आता याप्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.१२९ शिकस्त इमारती उत्तर झोनमध्येअकोला महापालिका क्षेत्रातील सर्वात महागडे भूखंड आणि बाजारपेठ उत्तर झोनमध्ये आहे. याच भागात सर्वात जास्त म्हणजे १२९ शिकस्त इमारती आहेत. अकोला पूर्व झोनमध्ये ६३, अकोला दक्षिण झोनमध्ये ७, आणि अकोला पश्चिममध्ये ७१ शिकस्त इमारती आहेत.शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गांधी मार्गावरील तोष्णीवाल धर्मशाळेचा परिसर, डॉ. शुक्ल यांची जीर्ण इमारत, कोठडी बाजारातील जुन्या इमारती, खोलेश्वर, किराणा बाजार, जुना कापड बाजार, मानेक टॉकीजजवळील जुन्या इमारती जयहिंद चौकाच्या आजूबाजूचा परिसर जुन्या इमारतींनी व्यापला आहे. त्याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.शिकस्त इमारतींच्या भोवती भाडेकरूंचा वाद४शहरातील बहुतांश जुन्या इमारतींमध्ये भाडेकरूंचा वाद आहे. जुन्या भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी घरमालक अनेकदा इमारत दूरूस्त न करता ती शिकस्त होण्याचीच परिस्थीती निर्माण करतात यामधून महागडी जागा ताब्यात घेतली जाते. असे प्रयोग अनेकांनी केले. त्यानंतर तो वाद वर्षोगणती न्यायालयात चालतो. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी शिकस्त इमारतींच्या तक्रारींकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत.

टॅग्स :AkolaअकोलाBuilding Collapseइमारत दुर्घटना