शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : १३ महिन्यात अपघाताचे १७३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:35 IST

गत तेरा महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ५२२ अपघात झाले असून, यात १७३ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर १३१ जण गंभीर जखमी झाले आहेत.

- नितीन गव्हाळे अकोला: वापरा शिरस्त्राण नाही तर जातील प्राण, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहने सावकाश चालवा,यांसारखे संदेश देणारे फलक रस्त्यांवर जागोजागी दिसतात; परंतु त्याचा वाहनचालकांवर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसते. गत तेरा महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ५२२ अपघात झाले असून, यात १७३ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर १३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. सरासरीनुसार जिल्ह्यात दिवसाला चार अपघात होत असल्याचे दिसून येते. खड्डे पडलेले रस्ते, नियमांचे उल्लंघन, मद्यसेवन, विना हेल्मेट वाहन चालविणे, अति घाई यासारखी कारणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

ही आहेत अपघातप्रवण स्थळेपातूर रोड, बाळापूर रोड, अकोट रोड, निंबा फाटा ते तेल्हारा रोड आणि शहरातील अप्पू टी पॉर्इंट, शिवर टी पॉर्इंट, डाबकी रेल्वेगेट, खडकी नाका, बाभूळगाव या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने दिली. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळेही अपघात घडत आहेत.

हेल्मेट सक्तीला ‘खो’!हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर इजा होऊन अनेकांचा बळी गेला आहे. काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. सातत्याने वाहतूक नियमांविषयी जनजागृती करूनसुद्धा वाहनचालकांमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करतात. परवानेसुद्धा रद्द करतात. त्यानंतरही कोणताही फरक दिसून येत नाही.

अल्पवयीन वाहन चालक सुसाट...जिल्हाभरात महाविद्यालयीन व शिकवणी वर्गाला जाणारे अल्पवयीन वाहनचालकांचा सुळसुळाट आहे. परवाना नसतानाही भरधाव वाहने चालवितात. वाहन चालविण्यासाठी त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता नसतानाही पाल्यांच्या हाती पालक वाहनाची चावी देतात. ही मुले सुसाट वेगाने दुचाकी दामटताना दिसून येतात. त्यामुळे पालकांनी सतर्क व्हावे.

वाहनचालकांनी वाहने चालविताना, हेल्मेट, सिटबेल्टचा वापर केल्यास अपघाताच्या घटना कमी होऊ शकतात; तसेच वाहनाच्या वेगाला मर्यादा घालाव्यात. रिफ्लेक्टर्सचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांना ब्रेक लागेल.-गजानन शेळके, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात