शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अकोला:१२०० शौचालय बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:01 IST

तब्बल १ हजार २०० ‘रेडीमेड’ शौचालयांचा आज रोजी ठावठिकाणाच नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत बांधकाम केलेल्या वैयक्तिक शौचालयांचा घोळ चव्हाट्यावर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने दुसऱ्यांदा चौकशी समितीचे गठन करीत तपासणीला सुरुवात केली. यादरम्यान, एका कंत्राटदाराने पात्र लाभार्थींना उपलब्ध करून दिलेल्या तब्बल १ हजार २०० ‘रेडीमेड’ शौचालयांचा आज रोजी ठावठिकाणाच नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या बदल्यात कर्तव्यदक्ष प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराचे १ कोटी ८० लाख रुपयांचे देयक तडकाफडकी अदा केल्याची माहिती आहे.शौचालय बांधताना संबंधित जागेचे ‘जिओ टॅगिंग’ करणे क्रमप्राप्त असताना मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक तसेच कंत्राटदारांनी लाभार्थींना विश्वासात घेऊन कागदोपत्री शौचालयांची उभारणी केल्याची तक्रार खुद्द सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. मनपाने सुमारे १९ हजार शौचालयांच्या देयकापोटी २८ कोटी ५० लाख रुपयांचे देयक अदा केले. ‘जिओ टॅगिंग’ न करता नेमकी किती शौचालये उभारली, असा सवाल उपस्थित झाल्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांनी चौकशी समितीचे गठन केले. पहिल्या चौकशी समितीचा अहवाल फेटाळल्यानंतर दुसऱ्यांदा गठित केलेल्या समितीला चौकशीसाठी ४० दिवसांची मुदत दिली होती. यादरम्यान, शहरातील एका एजन्सीने लाभार्थींना अतिशय सुमार दर्जाचे ‘रेडीमेड’ १ हजार २०० शौचालये दिली. त्या बदल्यात मनपाकडून १ कोटी ८० लाखांचे देयक प्राप्त केले. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत या बाराशे शौचालयांपैकी एकही शौचालय जागेवर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बांधकाम विभागाकडे बोटमनपा आयुक्तांनी ९ डिसेंबर २०१९ रोजी गठित केलेल्या चौकशी समितीला अहवाल तयार करण्यासाठी ४० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत १० जानेवारी २०२० रोजी संपुष्टात आली. अद्यापही अहवाल अपूर्ण असून, शौचालयांच्या ‘आॅफलाइन’ टॅगिंगला बांधकाम विभागाची संथ गती कारणीभूत असल्याचा दावा स्वच्छता व आरोग्य विभागाकडून केला जात आहे. या प्रकाराची आयुक्त कापडणीस दखल घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रेडीमेड शौचालय; अहवालाची प्रतीक्षा निळ्या रंगाच्या ‘रेडीमेड’ शौचालयांची सद्यस्थिती तपासल्यास एकही शौचालय जागेवर नसल्याची माहिती आहे. मनपाच्या चौकशी अहवालात रेडीमेड शौचालयांची वर्तमान स्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे. या अहवालाची अनेक नगरसेवक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका