शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठासह जिल्हय़ातील तळे, जलसंधारण बंधार्‍यात ठणठणाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:15 IST

अकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्‍यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरलाशेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्‍यात ठणठणाटडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्‍यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात बर्‍यापैकी पाऊस झाला आहे. पण, अकोला जिल्हय़ात दोन्हीही दिवस झालेला पाऊस हा १५ मि.मी.च्यावर वर नव्हता. हा पाऊस सर्वत्र नसल्याने काही भागात पडलेल्या पावसाची ही आकडेवारी आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात बहुतांश ठिकाणी जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली; परंतु त्यामध्ये पाणीच नसल्याने संरक्षित ओलितही शेतकर्‍यांना करता येत नसल्याची स्थिती आहे. कृषी विद्यापीठाच्या पाणलोट विकास प्रक्षेत्रावर जलसंधारणाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, वॉटर बँक तळे, अशी विविध कामे करण्यात आली आहेत. तसेच विहिरींचा गाळ उपसादेखील करण्यात आला आहे. सन २00४-0५ मध्ये यावर्षीसारखीच स्थिती होती. त्याच पृष्ठभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे. पण, यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने पुन्हा १२ वर्षांपूर्वीचे चित्र उभे झाले आहे. कृषी विद्यापीठातील बंधारे कोरडी आहेत. शिवणी भागाकडून येणार्‍या नाल्याचे खोलीकरण केल्याने गतवर्षी या नाल्यात जलसाठा संकलित झाल्याने, या भागातील भूगर्भ पातळी अडीच मीटरने वाढली होती. या भागातील सर्व विहिरींची जलपातळी वाढली होती. हे पाणी या नाल्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत होते. त्यामुळे रब्बी पिके व बीजोत्पादनाच्या कामात हे पाणी आले होते. तथापि, यावर्षी हा नाला कोरडा आहे. इतर सर्वच ठिकाणच्या नाल्यात पाणी उपलब्ध नसल्याने यावर्षीचे पाण्याचे हे चित्र कृषी विद्यापीठासमोर संकट घेऊन आले आहे. शरद सरोवर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणात गेले आहे; पण इतर दोन तळे आहेत, तेही कोरडीच आहेत.अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाच्या मागे वॉटर बँक तळे निर्माण करण्यात आले आहे. या तळय़ात पाणी साचल्यानंतर ते भूगर्भात जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली असू्न, येथे सबर्मसिबल इलेक्ट्रिक पंप लावण्यात आला आहे. या तळ्यात साचलेले पाणी एटीएमसारखे वापरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी हे तळे पाण्याने गच्च भरले होते. यावर्षी मात्र कोरडे आहे. -