शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

शाश्‍वत तंत्रज्ञानामुळे शेती विकास - आर.जी. दाणी

By admin | Updated: October 21, 2014 00:30 IST

विदर्भातील १४00 शेतक-यांनी जाणून घेतले कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान.

अकोला : कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विदर्भातील शेती विकासाला चालना मिळाली आहे. म्हणूनच या शाश्‍वत तंत्रज्ञानाला शेतकर्‍यांच्या शेतात नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या शिवारफेरीदरम्यान, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस प्रत्येक वर्षी शेतकरी शिवारफेरीने साजरा करण्यात येतो. १९ आक्टोबरपासून शिवारफेरीला सुरू वात झाली आहे. आतापर्यंत या शिवारफेरीत १४00 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवून कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. शिवारफेरीच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी विदर्भातील वाशिम, अमरावती, यवतमाळ व नागपूर जिल्हय़ातील महिला-पुरुष शेतकर्‍यांनी शिवारफेरीत सहभाग घेतला.या शेतकर्‍यांनी कापूस संशोधन प्रक्षेत्रावरील कापसाचे विविध व उन्नत वाण, धागा, लांबीच्या प्रकारानुसार कापसाचे देशी वाण आदींची माहिती शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली. कापसावर येणारी पांढरी माशी, वातावरणात होणार्‍या बदलामुळे होणारे विविध रोग, बोंडगळ इत्यादी शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन शास्त्रज्ञांनी केले. विदर्भात बहुतांश कोरडवाहू शेती असल्याने या विद्यापीठात कोरडवाहू संशोधन प्रक्षेत्राचा विकास करण्यात आला आहे. या प्रक्षेत्रावरील विविध आंतरपीक पद्धती,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पायडल पंपाद्वारे शेततळय़ातून करण्यात येणारे संरक्षित ओलित आदी मॉडेल ठेवण्यात आले आहेत. कमी पाण्यात चांगली शेती कशी करण्यात येते, हे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांनी बघितले. ऊस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस या पिकात आंतरपीक व पट्टा पीक पद्धतीचा प्रयोग या कृषी विद्यापीठाने केला आहे. या प्रयोगाची माहिती शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिली. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तेलबिया वाणाची सर्वत्र मागणी वाढली आहे. यातील गुलाबी रंगाची करडई या वाणाची विस्तृत माहिती शेतकर्‍यांनी जाणून घेतली.