शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

दीड महिन्यानंतरही ‘भूमिगत’च्या नोटीसला उत्तर नाहीच ; महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:57 PM

हायकोर्टाला नोटीस जारी करून दीड महिन्याचा कालावधी होत असला, तरी अद्यापही महापालिका प्रशासनाने नोटीसचे उत्तर सादर केले नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

ठळक मुद्दे‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’ (मलनिस्सारण प्रकल्प) बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर आक्षेप घेत शिवसेनेने नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. खंडपीठाने राज्य शासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका तसेच संबंधित कंपनीला नोटीस जारी केली होती. नोटीस जारी करून दीड महिन्याचा कालावधी होत असला, तरी अद्यापही मनपा प्रशासनाने नोटीसचे उत्तर हायकोर्टात सादर केले नाही.

अकोला: भूमिगत गटार योजनेतील ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’ (मलनिस्सारण प्रकल्प) बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर आक्षेप घेत शिवसेनेने नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली असता द्विसदस्यीय खंडपीठाने राज्य शासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका तसेच संबंधित कंपनीला नोटीस जारी केली होती. हायकोर्टाला नोटीस जारी करून दीड महिन्याचा कालावधी होत असला, तरी अद्यापही महापालिका प्रशासनाने नोटीसचे उत्तर सादर केले नसल्याची माहिती उजेडात आली आहे. या प्रकारामुळे मनपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी ‘अमृत’ योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना मंजूर झाली. महापालिका प्रशासनाने ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनी, ठाणे यांना १३ डिसेंबर २०१७ रोजी कामाची वर्कआॅर्डर दिली. पहिल्या टप्प्यात शासनाने मंजूर केलेली ६१ कोटींची योजना ८० कोटींच्या आसपास जाणार आहे. कंपनीला दोन वर्षांच्या कालावधीत योजनेचे काम पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. ‘भूमिगत’मधील सर्वात महत्त्वाचा घटक मानल्या जाणाºया ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’चे बांधकाम शिलोडा येथील सहा एकर परिसरावर सुरू आहे. या कामात कंपनीने वापरलेले साहित्य निकषानुसार नसल्याचा तपासणी अहवाल अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिल्यामुळे कंपनीसह तांत्रिक सल्लागार असणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तपासणी अहवालानंतरही कंपनीच्या देयकातून दंडात्मक रक्कम कपात न करता मजीप्राने सात कोटींच्या देयकाची फाइल मनपा प्रशासनाकडे सादर केली होती. या मुद्यावर मनपातील शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी आक्षेप नोंदवत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. द्विसदस्यीय खंडपीठाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, मजीप्राचे कार्यकारी अभियंता, ईगल इन्फ्रा कंपनीसह मनपा प्रशासनाला नोटीस जारी केली होती. नोटीस जारी करून दीड महिन्याचा कालावधी होत असला, तरी अद्यापही मनपा प्रशासनाने नोटीसचे उत्तर हायकोर्टात सादर केले नाही, हे येथे उल्लेखनीय.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका