शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यात स्वगृही आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:34 IST

अकोला : विश्‍वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होती.

ठळक मुद्देअकोलेकरांनी केले जल्लोषात स्वागत आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विश्‍वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, आदित्यचे प्रशिक्षक भरत डिक्कर, मार्गदर्शक जावेद अली, वडील डॉ. शैलेश ठाकरे, काका गोपी ठाकरे, माजी रणजीपटू नंदू गोरे, रणजीपटू रवी ठाकूर यांच्यासह क्रिकेटप्रेमी व नातेवाईक आणि चाहतावर्ग उपस्थित होता.रेल्वेस्थानकावरच रेल्वे पोलिसांनीदेखील आदित्यचे स्वागत केले. अकोल्यातील क्रिकेट खेळाडूला देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आणि संघाने विजेतेपद मिळविले. जेतेपदाचा क्षण आयुष्यातील सर्वात आनंददायी होता. आस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांचाही पाठिंबा संघाला होता. त्यापेक्षा संघ प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे प्रोत्साहन संघाला मिळत होते. भारतीय संघाला तिरंगा फडकविण्यात यश आले, असे यावेळी आदित्य म्हणाला.

यानंतर अकोला क्रिकेट क्लब येथे आदित्यचे ढोलाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. आदित्यची आई संगीता ठाकरे यांनी त्याची विजयी आरती ओवाळून स्वागत केले. अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटनांच्या पदाधिकारी, अकोला क्रिकेट क्लब कर्मचारी वर्ग व त्याच्या सहकारी खेळाडूंनी आदित्यचे स्वागत केले. क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, अँड.  मुन्ना खान, दिलीप खत्री, विवेक बिजवे, कैलास शहा, सुमेध डोंगरे, क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार, धीरज चव्हाण आदींसह क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.

आज मोर्णा काठावर आदित्यचा सन्मानअकोला जिल्हा प्रशासनाच्यावतीने उद्या शनिवार, १0 फेब्रुवारी सकाळी ९ वाजता मोर्णा नदी काठ, गीता नगर येथे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते आदित्यचा सन्मान करण्यात येणार आहे.

आई-वडील पाहत होते पोराचं कौतुकआदित्यच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकावर स्वयंस्फुर्तीने अकोलेकर क्रिकेटप्रेमी आले होते. आदित्यचे हे कौतुक त्याचे आई-वडील डोळे भरू न पाहत होते. आदित्य गाडीतून उतरताच त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारू न कौतुक केले, तर आईच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAkola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लब