Aditya Thakre of Akola selected in the Indian youth squad | अकोल्याच्या आदित्य ठाकरेची भारतीय युवा संघात निवड
अकोल्याच्या आदित्य ठाकरेची भारतीय युवा संघात निवड

ठळक मुद्दे १९ वर्षाखालील विश्‍वचषक स्पर्धेत खेळणार!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला क्रिकेट क्लबचा जलदगती गोलंदाज आदित्य ठाकरे याची १९ वर्षाखालील विश्‍वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य  जायबंदी झालेल्या पोरेल या खेळाडूची जागा घेणार असून मंगळवारी तो न्युझीलंडला रवाना होत आहे. 
आदित्यने विदर्भाकडून खेळताना रणजी करंडक अंतिम सामन्यात आपल्या जलद मार्‍याने दिल्लीचे दोन गडी बाद करून विदर्भाला पहिले विजेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या या कामगिरीची निवड समितीने दखल घेतली.  कर्णधार पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला असून, रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. यापूर्वीसुद्धा आदित्यने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात मलेशियात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

आदित्यची भारतीय संघात निवड झाल्याचे कळले. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तो शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. त्याने देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही सदिच्छा.
- प्रा. डॉ. शैलेश ठाकरे
(आदित्यचे वडील)


Web Title: Aditya Thakre of Akola selected in the Indian youth squad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.