Akoli's Aditya Thakre, Shrikant Wagh of Buldhana; The IPL players are included in the auction list | अकोल्याचा आदित्य ठाकरे, बुलडाण्याच्या श्रीकांत वाघवर लक्ष; ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलाव यादीत समावेश
अकोल्याचा आदित्य ठाकरे, बुलडाण्याच्या श्रीकांत वाघवर लक्ष; ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलाव यादीत समावेश

ठळक मुद्देआयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवातलिलावाच्या यादीमध्ये विदर्भातील ११ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे

नीलिमा शिंगणे-जगड। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्‍चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील समावेश आहे. आदित्य आणि श्रीकांतचा खेळ कामगिरीच्या बळावर आयपीएल-२0१८ मध्ये भाव वधारला आहे.
आयपीएल २0१८ मधील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. एक हजारांहून अधिक खेळाडूंनी यामध्ये नोंदणी केली होती; मात्र बीसीसीआयने छाटणी करीत फक्त ५७८ खेळाडू निवडले. खेळाडूंचे प्रोफाइल चेक करू न आठ वर्गवारी केली. आंतरराष्ट्रीय स्लॅबसाठी दोन करोड रुपये ते ५0 लाख रुपयांपर्यंत किंमत आहे, तर अनकॅप खेळाडूंचे आधारमूल्य हे ४0 लाख रुपये, ३0 लाख आणि २0 लाख रुपये आहे. 
लिलावाच्या यादीमध्ये विदर्भातील ११ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. यामध्ये कर्ण शर्मा, फैज फजल, रजनीश गुरुबानी, आदित्य ठाकरे, श्रीकांत वाघ, आदित्य सरवटे, अपूर्व वानखडे, अक्षय वखारे, जितेश शर्मा, अक्षय कर्णेवार, ललित यादव यांचा समावेश आहे. कर्ण शर्मा व फैज फजल स्लॅब खेळाडूंच्या यादीत आहे. कर्णवर दोन करोडपासून तर फैजवर ५0 लाखांपासून धनवर्षावास सुरुवात होईल, तर रजनीश, आदित्य, श्रीकांत, आदित्य, अपूर्व, अक्षय, जितेश अक्षय वखारे, ललित यांच्यावर २0 लाखांपासून धनवर्षाव होईल. विदर्भातील खेळाडूंनी यंदा रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केल्याने फ्रेन्चाईजच्या नजरा वैदर्भीय क्रिकेटपटूंकडे वळल्या. 
आदित्य हा अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू असून, जलदगती गोलंदाज आहे. १९ वर्षांआतील विश्‍वचषक स्पर्धेकरिता आदित्यची यंदा निवड झाली. रणजी ट्रॉफ ीतही उत्तम खेळप्रदर्शन करीत विदर्भाला विजेतेपद मिळवून देण्यात आदित्यचा सिंहाचा वाटा आहे. 
बुलडाणा जिल्हा क्रिकेट संघातून श्रीकांत वाघने आपल्या खेळ कारकिर्दीला सुरुवात केली. शहरापासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या चिखला येथील मूळ रहिवासी श्रीकांत आज आपल्या अष्टपैलू खेळी आणि भेदक गोलंदाजीमुळे भारतीयांच्या मनावर राज्य करीत आहे.


Web Title: Akoli's Aditya Thakre, Shrikant Wagh of Buldhana; The IPL players are included in the auction list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.