शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

राज्यात माध्यमिकचे ६४५ शिक्षक ठरले अतिरिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:20 PM

२0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार राज्यामध्ये माध्यमिक शाळांमधील ६४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आटोपली आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त शिक्षकांचे ‘आॅन दी स्पॉट’ समायोजन करण्यात येत आहे.

अकोला: गत तीन-चार महिन्यांपासून राज्यामध्ये माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती, आरक्षण, विषय आणि वर्गांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार राज्यामध्ये माध्यमिक शाळांमधील ६४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या सर्व शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आटोपली आहे.शिक्षण विभागाने शासनाच्या समायोजन पोर्टलवर माध्यमिक शाळांना अतिरिक्त शिक्षकांच्या माहितीसह, रिक्त पदे, आरक्षण, विषयांची माहिती टाकण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्यातील माध्यमिक शाळांनी ही माहिती समायोजन पोर्टल भरली. २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची पडताळणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. माध्यमिक शाळांमधील एकूण ६४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, तर १,२0६ पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी रिक्त जागांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या ५0 च्यावर आहे. त्या जिल्ह्यात समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी आटोपली असून, एकूण ६३ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये संचमान्यतेची पडताळणी करताना, वाढीव पदे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, अतिरिक्त शिक्षकांचे ‘आॅन दी स्पॉट’ समायोजन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक