शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २५७ वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:33 IST

दोन प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हा दाखल मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे भोवले लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरासह जिल्ह्यात ...

दोन प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हा दाखल

मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता प्रशासनाने मास्क न घालणारे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर ठाकूर व सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी बुधवारी शहराच्या विविध भागात कारवाई करत सुमारे २५७ मास्क न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही शहरात मात्र त्याचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. दररोज कोरोनाचे १५० ते २०० रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे हा धोका अधिक वाढत असताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत; मात्र त्यानंतरही शहरात प्रचंड गर्दी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, ठाणेदार उत्तम जाधव यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच १९९ मास्क न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर टिळक रोडवरील सुनील फॅशन ड्रेसेसचे मालक आनंद हरीमला अडवाणी, ताजना पेठ येथील रामाणी ब्रदर्स निरमा शिलाई मशीनचे मालक संतोष प्रकाशलाल रामाणी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनाला आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, मास्क न घालणारे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. हे कारवाईचे सत्र गुरूवारपासून अधिक कठोरपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी दिली.

शहरातील कोणत्याही दुकानात चहा टपरी, पान टपरी तसेच गर्दीच्या ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक होत असतानाच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. मात्र, जे नागरिक या नियमाचा भंग करतील, त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारपासून ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- सचिन कदम

शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.