दुचाकींची अमोरासमोर धडक; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:18 IST2019-04-02T18:18:19+5:302019-04-02T18:18:52+5:30
पातूर (अकोला): भरधाव दोन दुचाकींची अमोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २ एप्रिल रोजी दुपारी पातूर-बाळापूर मार्गावर घडली.

दुचाकींची अमोरासमोर धडक; दोन गंभीर
पातूर (अकोला): भरधाव दोन दुचाकींची अमोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २ एप्रिल रोजी दुपारी पातूर-बाळापूर मार्गावर घडली.
पातूर ते बाळापूर मार्गावर दुचाकी क्र. एमएच ३७ एफ ८७९६ आणि एमएच २९ जी ९४७० मध्ये अमोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवर मो. सादीक मो. नजीर (१९) रा. शनिवारपुरा पातूर आणि प्रमोद लक्ष्मण उपर्वट (३२) रा. देऊळगाव हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ग्रामस्थांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमींना परस्पर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अपघाताविषयी पातूर पोलिसांत कुठलीही नोंद नव्हती. (प्रतिनिधी)
फोटो आहे