तेल्हारा-वरवट मार्गावरील अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, दोन भावांसह तीन मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 15:31 IST2026-03-01T15:30:46+5:302026-03-01T15:31:01+5:30

Akola Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावासह तिन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा-वरवट मार्गावर तेल्हा शहराजवळील गुणवंत महाराज कॅनॉल परिसरात रविवार, १ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Accident on Telhara-Varvat road; Truck hits two-wheeler, three children including two brothers die | तेल्हारा-वरवट मार्गावरील अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, दोन भावांसह तीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा-वरवट मार्गावरील अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, दोन भावांसह तीन मुलांचा मृत्यू

अकोला - भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावासह तिन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा-वरवट मार्गावर तेल्हा शहराजवळील गुणवंत महाराज कॅनॉल परिसरात रविवार, १ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, माळेगाव बाजार येथील दोन सख्ख्या भावांसह तीन अल्पवयीन मुले दुचाकीने माळेगावहून तेल्हाराकडे येत होते. त्यावेळी वरवटकडे जाणाऱ्या एमएच ३० बीडी ७१५८ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात गणेश दीपक अप्तुरकर (१७), साई रामेश्वर वैष्णव (१३) आणि दर्शन रामेश्वर वैष्णव (१६) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून तेल्हारा पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत. मृत मुलांचे मृतदेह पंचनाम्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे माळेगाव व तेल्हारा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Web Title : तेल्हारा-वरवट मार्ग हादसा: दो भाई सहित तीन लड़कों की मौत

Web Summary : तेल्हारा-वरवट मार्ग पर तेज़ रफ्तार ट्रक ने बाइक को टक्कर मारी, जिसमें दो भाइयों सहित तीन लड़कों की मौके पर ही मौत हो गई। घटना तेल्हारा के पास हुई, जिससे इलाके में शोक फैल गया। चालक फरार, पुलिस जांच कर रही है। स्थानीय लोगों ने सड़क सुरक्षा के कड़े उपाय करने की मांग की।

Web Title : Telhara-Varvat Road Accident: Three Boys, Including Two Brothers, Dead

Web Summary : A speeding truck collided with a bike on Telhara-Varvat road, killing three boys, including two brothers, instantly. The incident occurred near Telhara, sparking grief in the area. The driver fled, and police are investigating. Locals demand stricter road safety measures.