शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खाद्य पदार्थ विकणार्‍यांना अभय

By admin | Updated: May 16, 2014 21:48 IST

अस्वच्छ अथवा भेसळयुक्त पदार्र्थ विकणार्‍यांवर ठोस कारवाई करण्यात अन्न व औषध प्रशासनाची टाळाटाळ !

निंबा फाटा (अकोला): अस्वच्छ अथवा भेसळयुक्त पदार्र्थ विकणार्‍यांवर ठोस कारवाई करण्यात अन्न व औषध प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे. शहर व ग्रामीण भागातील हॉटेल्सची तपासणी करणे व नमुने तपासणीसाठी पाठवून हॉटेल्स व्यावसायिकांवर कावाई करण्याचे काम अन्न व औषध विभागाचे आहे; परंतु ग्रामीण भागात सर्रास रस्त्यावर खाद्य पदार्थांची विक्री होत आहे. तसेच पदार्थ काढण्यासाठी हलक्या प्रतीचे तेल वापरण्यात येत आहे, हे माहीत असताना हॉटेल्स मालकावर हा विभाग मेहेरबान झाला आहे. भेसळयुक्त पदार्थाची विक्री होत असल्याची ओरड झाल्यास थातूरमातूर कारवाई केली जाते; परंतु शेकडो हॉटेल्सची तपासणीच झाली नसल्याचे समजते. बाळापूर तालुक्यातील पारस, निंबा फाटा, बाळापूर, उरळ या गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर खाद्य पदार्थांची विक्री सुरू आहे. हॉटेल्सच्या परिसरात असलेली अस्वच्छता, उघड्यावर पदार्थांची विक्री आदींवर दंडात्मक कारवाईचे अधिकार तालुका स्तरावर पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनाही आहेत. नगर पालिका व अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यात लागेबांधे असल्यामुळे सर्वकाही आलबेल असल्याचे दाखविण्यात येत आहे.