वाशिम बायपासवरील जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल

By सचिन राऊत | Updated: September 26, 2022 18:11 IST2022-09-26T18:10:52+5:302022-09-26T18:11:55+5:30

वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथे दिनेश बोरकर हा विजय इंगळे याच्या साह्याने जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली.

A raid on a gambling den on Washim Bypass | वाशिम बायपासवरील जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल

वाशिम बायपासवरील जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथे दिनेश बोरकर हा विजय इंगळे याच्या साह्याने जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणावरून शेख वसीम शेख मोइम वय ३० वर्ष राहणार शहाबाबू शाळेजवळ, सय्यद इरफान सय्यद मन्नान वय २६ वर्ष राहणार बिलाल नगर या दोघांना ताब्यात घेतले तर पळून गेलेल्या युवकाची माहिती विचारली असता त्याने विजय सुरेश इंगळे राहणार भगीरथ वाडी हा पळून गेल्याची माहिती दिली. 

यावरून पोलिसांनी तीन ते चार जणांकडून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.
 

 

Web Title: A raid on a gambling den on Washim Bypass