जपान जीन परिसरातील प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:35 IST2022-02-02T14:35:25+5:302022-02-02T14:35:56+5:30

चार तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात: १५ ते २० लाख रूपयांचे नुकसान

A huge fire broke out in a plastic toy godown in Japan's Jin area | जपान जीन परिसरातील प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग

जपान जीन परिसरातील प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग

अकोला : शहरातील जपान जीन भागात असलेल्या एका प्लास्टिक खेळणी व इतर साहित्याच्या गोडावूनला भीषण आग लागली आहे. या आगीत अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, आगीत गोडावूनमधील १५ ते २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

जपान जीन परिससरात आज सकाळी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी चार तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. 

Web Title: A huge fire broke out in a plastic toy godown in Japan's Jin area