शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

६५० प्रस्तावांना मान्यताच नाही

By admin | Updated: May 7, 2014 00:21 IST

तब्बल ६५० प्रस्तावांना रीतसर मान्यता नसल्याने संपूर्ण प्रस्ताव रद्द होणार असल्याची माहिती आहे.

अकोला: शासनाकडून प्राप्त २६ कोटींच्या निधीतून सर्वसमावेशक विकास कामांचा प्रस्ताव तयार न करता, सत्तापक्षाने मनमानी पद्धतीने तयार केलेल्या तब्बल ६५० प्रस्तावांना रीतसर मान्यता नसल्याने संपूर्ण प्रस्ताव रद्द होणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात प्रशासनाकडूनही संकेत मिळत असल्याने आता खर्‍या अर्थाने विकास कामे मार्गी लागतील,अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने २० मार्च २०१३ रोजी महापालिकेसाठी ८ कोटी रुपये, तर ६ एप्रिल रोजी २० कोटी रुपयांची मूलभूत विकास कामांसाठी तरतूद केली. प्राप्त निधीतून शहरात सर्वसमावेशक विकास कामे अपेक्षित असताना सत्तापक्षाने नियमांना बासनात गुंडाळून ठेवत, प्रस्ताव तयार केले. २८ कोटींच्या निधीतून २ कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन करणार्‍या कंत्राटदाराच्या थकीत देयकासाठी मंजूर करण्याचा ठराव घेण्यात आला होता. उर्वरित २६ कोटींपैकी १० कोटी रुपयांची तरतूद मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यांसाठी केली होती. उर्वरित १६ कोटीतून प्रभागातील विकास कामांसाठी समान निधीची तरतूद करणे क्रमप्राप्त होते. तसे न करता पदाधिकार्‍यांनी स्वमर्जीने निधी वाटपाचा निर्णय घेतला. सत्तापक्षाने स्थापन केलेल्या समन्वय समितीने सुरुवातीला विरोधी पक्ष भाजपच्या नगरसेवकांना १५ लाख, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना २० लाख रुपये निधी देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर मात्र भाजप नगरसेवकांना केवळ पाच लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. ही बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी शासन निधीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते; परंतु विभागीय आयुक्तांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवत सत्तापक्षाने चक्क ६५० प्रस्ताव तयार केले. तूर्तास या निधीत ५० टक्के रक्कम (मॅचिंग फंड) जमा करण्याची अट शासनाने रद्द केल्याने २६ कोटींची विकास कामे मार्गी लागण्याची चिन्हं आहेत. अशा स्थितीत सत्तापक्षाने तयार केलेल्या ६५० प्रस्तावांना कायदेशीर मान्यता नसल्याने संपूर्ण प्रस्ताव रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.